आपल्या शरीराची आणि मनाची जर आपल्याला योग्य तशी काळजी घ्यायची असेल तर आपल्या आहारामध्ये रोजच्या रोज विविध पोषकतत्त्वांची गरज भासते.ह्यामध्ये सर्वात महत्वाचा कुठला घटक असेल तर तो आहे कॅल्शियम, कारण हाडे व दात यांच्या मजबूतीसाठी कॅल्शियमची गरज कायमच लागते. कॅल्शियम आपल्या शरीराला कोणकोणत्या पदार्थातून मिळू शकते ते आता आपण येथे पाहूयात.
दूध –
आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असलेला आणि रोजच्या जीवनातला अविभाज्य घटक म्हणजे दूध! जर आपल्याला कॅल्शियमची कमतरता भरून काढायची असेल तर रोज एक ग्लास दूध आवर्जून प्या कारण ह्यामध्ये नैसर्गिकत्या भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि शरीराला आवश्यक असलेले कॅल्शियम आपल्याला ह्यातून सहज मिळू शकते.
सुकामेवा –
शरीरातील कॅल्शियमची कमी जर दूर करायची असेल तर आपल्या रोजच्या आहारात सुकामेव्याचा अवश्य समावेश करा. अक्रोड, बदाम, पिस्ता आणि काजू ह्यांचे प्रमाणामध्ये आणि रोजच्या रोज केलेले सेवन आपल्या शरीराला नक्कीच फायदेशीर ठरेल.
चीज –
आताच आपण दुधाचे फायदे पहिले आणि ह्याच दुधापासून बनलेले चीजसुद्धा खूपच कॅल्शियमने भरलेले असते, तसेच ह्यामध्ये शरीराला आवश्यक असे अन्य पोषकघटकही असतात. ह्याचे नियमित सेवन आपल्या शरीराची कॅल्शियमची कमतरता भरून काढायला नक्कीच फायदेशीर ठरेल.
हिरव्या पालेभाज्या –
तज्ञ मंडळींचे नेहमीच असे म्हणणे असते की आपण आपल्या रोजच्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या खाल्या पाहिजेत कारण पालेभाज्यात मुबलक प्रमाणात कॅल्शियम असल्याने शरीरातील कॅल्शियमची कमी भरून निघण्यास खूपच मदत होते. ब्रोकोली, पालक यांसारख्या पालेभाज्यांचा आहारात जाणीवपूर्वक समावेश करावा.
— संकेत रमेश प्रसादे
Leave a Reply