नवागता, बाळा, तुज बघुनी
आनंदानें भरली कावड
मरुस्थला भिजवी श्रावणझड .
–
नवागता, नवकिरण भास्कराचा
शुभंकरा, तूं कळस मंदिराचा
आशीष तिथें देई प्रशांत-उदधी
देइ इकडुनी आशीर्वच हिमनिधी .
–
प्रशांत–उदधी : Pacific Ocean
हिमनिधी – हिमालय
–
बाळा, ‘उद्या’ची आशा तूं
ही समजशील कां भाषा तूं ?
एकच भाषा येते तुज – ‘रुदन’
त्यानें प्रमुदित ‘काल’-‘उद्या’चे जन.
–
काल–उद्याचे जन : Yesterday’s Generation,
& Today’ Generation.
–
बाळा, तुझ्यासाठी –
भंवतीची सृष्टी
करी पुष्पवृष्टी ;
‘Near & Dear’ नारी-नर
करती अविरत टाळ्यांचा गजर.
–
तुला पाहुनी, तुझे चाहते
म्हणत जवळचे-जन समस्त –
‘बाळा, तू चीज़ बड़ी है मस्त मस्त !’ .
– – –
— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
M- 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in