ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार हा ‘फ्रेंडशिप डे’ अर्थात ‘मैत्री दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
मैत्री म्हणजे काय असतं? एकमेकांचा विश्वास असतो? अतूट बंधन असत? की हसता खेळता सहवास असतो? मैत्री म्हणजे मैत्री असते, व्याख्या नाही तिच्यासाठी; बंधन नसत, त्या असतात रेशीमगाठी.
मैत्री म्हणजे काय? कुणासाठी कट्टय़ावरची मज्जामस्ती तर कुणासाठी प्रेम, कुणासाठी आधार देणारी यारी तर कुणासाठी केवळ दुनियादारी, तर काहींसाठी शब्दांत सांगता न येणारं बरंच काही..!
काही नाती एका व्याखेत बसवणं अगदी अवघड होऊन जातं. कारण प्रत्येकाने त्याकडे ज्या वेगळ्या दृष्टीने पाहिलेलं असतं, त्यामुळे त्या नात्यातील अनेक पैलू समोर येत असतात. मैत्री हे नातंच असं आहे, जे प्रत्येकानं अनुभवलेलं असतं. या मैत्रीला साजरं करण्याचा दिवस म्हणजे मैत्री दिवस, अर्थात फ्रेंडशिप डे. तसं मित्रमैत्रिणी एकत्र भेटले की तो दिवस उत्साहाचा नि उत्सवाचाच असतो. पण आवर्जून भेटीचं एक कारण म्हणजे हा फ्रेंडशिप डे..!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply