नवीन लेखन...

फ्युचरिस्टिक स्पेस टुरिझम

सूर्यमाला सोडून आता आम्हाला पृथ्वीवरची बाराशे वर्षे होऊन गेली होती. सध्या अंतराळाच्या ज्या क्षेत्रातून आम्ही जात होतो तिकडे फक्त धुळीचे प्रचंड ढग होते, प्रकाश दर्शन होऊन जवळपास दिडशे वर्षे लोटली होती. आता आम्हाला प्रकाशाची नितांत आवश्यकता भासत होती.

आम्ही हबल मॅप बघून M30 गॅलेक्सी कडे निघालो, रस्त्यामध्ये आम्हाला दोन क्वासार्सना चुकवून जायचं होतं. क्वासार्सची ग्राव्हिटेशनल फिल्ड्स एकमेकांच्या इतकी गुंतलेली होती की त्यातून ग्रेव्हीटेशनल इन्टरफियरन्सचा पॅटर्न तयार झालेला आमच्या इंडिकेटरने दाखविले.

त्या इंटरफियरन्स पॅटर्नमध्ये आम्हाला झिरो ग्रेव्हीटेशनचे पट्टे मिळाले आणि आम्ही त्यातून अलगदपणे निसटलो. त्यात आमची सत्तर वर्षे गेली.

जशी जशी गॅलेक्सी जवळ येत चालली होती तसतसा आमचा क्वासार्सचा धोका संपून गेला. ग्राव्हटेशनही अगदी काँक्रिटच्या रोड सारखं प्लेन होतं. कुठे चढउतार नाहीत किंवा कुठे वेडेवाकडे कुठलेच पॅटर्नस् नाहीत एकदम स्वच्छ आणि क्लियर. एवढ्यात सर्च लाईट सारख्या एका पल्सारचा जबरदस्त न्यूट्रॉन बीमचा झोत आमच्या रॉकेटवर धडकला, जोरदार बफेटिंग झाले आणि आम्ही चांगलेच दचकलो पण आमच्या रॉकेटमधली ऑटोमॅटिक सिस्टीम सावध होती, तिने झटदिशी आपली लेव्हल बीमच्या कॅल्क्युलेटेड हाइट पेक्षा अर्ध्या प्रकाश वर्षाने वरती उचलली आणि आम्ही बचावलो. शेवटी M30 मध्ये आम्ही पोहोचलो आणि हबल मॅपने सजेस्ट केलेल्या एका ग्रहावरती उतरलो. फार सुंदर अनुभव होता तो, जांभळ्या रंगाची सृष्टी होती, जांभळे पाणी आणि जांभळेच आकाश.

आम्ही त्या ग्रहावरती भरपूर फिरलो, अंदाजे सव्वाशे वर्षे विश्रांती घेतली आणि आपल्या सूर्यमालेत येण्यासाठी निघालो.
सुमारे दोन एक हजार वर्षे तरी ओलांडली होती, आमचं घर किंवा आमचं सरकार तिकडे अस्तित्वात नसणार होतं.
मधले व्हाईट ड्वार्फ धूमकेतू आणि मिटेओराईट्सचा बेल्ट ओलांडत ओलांडत आम्ही सुमारे चोविसशे वर्षांनी पृथ्वीवर पोहोचलो.
आता आमच्या डिव्हाईस मध्ये हबल मॅप्स बंद होऊन ऑटोमॅटिकली गुगल मॅप दाखवू लागलं होतं.

आत शिरतानांच आमचं अभूतपूर्व स्वागत झालं, अडीच हजार वर्षांनी आम्ही असं मातीतलं स्वागत अनुभवत होतो. आता पुजेला बसायचं असा आग्रह बायकोने लावून धरला होता. पृथ्वीवर आज आम्ही सर्वात जास्त वयोवृद्ध व्यक्ती होतो आणि सरासरी सर्वांपेक्षा अधिक तरुणही दिसत होतो. आम्ही पृथ्वीवर लँड झालो तेव्हा समोरच बायको चहा घ्यायला चला असे सांगत होती, एवढ्या मोठ्या प्रवासातून शिणून आल्यावर अडीच हजार वर्षांनंतरचा पहिला चहा घ्यायचा म्हणून मन एकदम प्रफुल्लित झालं. चहा घेण्यासाठी अनावधानाने अंगावरचे पांघरलेले जाडजूड कपडे बाजूला केले तेव्हा मला अस्ट्रोनोटच्या वेषातून बाहेर आल्यासारखं एकदम हलकं हलकं वाटलं.

बायकोनं अगोदर बाथरूममध्ये पिटाळल्यावर पायाला गारेगार पाणी लागलं तेव्हा मी खरे डोळे उघडून बघितलं तर मी घरातल्या बाथरूममध्येच होतो आणि बेडरूममध्ये अंगावरचे पांघरूण अस्ताव्यस्त पडलेले होते. फ्युचरिस्टिक स्पेस टुरिझम में आपका स्वागत हैं।

— विनय भालेराव

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..