अशा बैलगाड्या पाहिल्या की पूर्वीची आठवण येते पूर्वी वाहने फार कमी होती. बैलगाडी किंवा सायकल असे प्रवासाचे साधन असायचे. पूर्वीची बैलगाडी व गाडीला झुंपलेली दोन बौले त्यांच्या अंगावर टाकलेले रेशमी वस्त्राचे. रंगीबेरंगी आरशाने नटलेले बैलाच्या अंगावरील झूल अतिशय सुंदर दिसायचे. गाडीत बसलेला शेतकरी त्याच्या डोक्याला बांधलेला टावेल. दोन हातात बैलांची कासरी चाबूक पाठीमागे बैलगाडी मध्ये बसलेली. लहान मुले आणि गाडीच्या पाठीमागून धावत येणारा कुत्रा ही सारी आठवण येते. लोककवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या गीतातून समाजात वावरणाऱ्या अनेक लोकांचे वर्णन चांगल्या पद्धतीने लिहिले आहे. पूर्वी लोक संगीतामध्ये अनेक जुनी गाणी संगीतात कंपोज करून समाजाला ऐकवली आहेत. पूर्वी कर्मणुकीची साधने अतिशय कमी प्रमाणात होती ग्रामीण भागामध्ये भजन सोंगी भजन ठराविक गावांमध्ये नाट्य संस्था. तमाशा आणि तमाशामध्ये सादर होणारे पौराणिक किंवा सामाजिक वग नाट्य. त्याकाळी भेदिक सुद्धा होते परंतु पूर्वी लोकसंगीत लिहिणारे लोककवी यांनी अनेक चांगली गाणी समाजाला ऐकवली आहेत. ती लिहिलेली गाणी पुन्हा पुन्हा कानावरून गेली म्हणजे एक प्रकारचं नवल वाटते. त्या गाण्यांमध्ये निसर्ग वर्णन बैलगाडी व बैलाचे वर्णन नात्यातील माणसांची गाणी ही राहून राहून आठवतात उदाहरणार्थ सखुबाई सखुबाईगं, तुझा नवरा बोलाव तुयागं, तंबाखू बिंबाखू खात असलं, डब्बी त्याला घावत नसंल, जा जा येत नाही म्हणून सांग. किंवा नाही खेळणार मुंबई मटका, वामनदादा कर्डक यांनी विविध विषयावर लेखन केले आहे हे प्रामुख्यात जाणवते. भिमाई रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश पडणारी कितीतरी गाणी ऐकावयास मिळतात….।
…. हेवहेवं पावना, सखूचा मेव्हणा, माझ्याकडे बघून हसतोय ग, काहीतरी घोटाळा दिसतोय ग, अशी जुनी गाणी ऐकली म्हणजे मन भूतकाळाकडे परत असत एवढे मात्र निश्चित. तर एकीकडे कथानकाला अंसरून काही गीतकार गीते तयार करत असतात परंतु पूर्वीची गाणी व आत्ताची गाणी यामध्ये भयंकर फरक जाणवतो. पूर्वी वाहनांची संख्या कमी असल्यामुळे लग्न वराड बैलगाडीतून जात असे. बैलगाडीला बैल सजवलेली असतात आणि गाडीमध्ये नवीन कपडे घालून बायका आवडीने लग्नाला जात असे. ती एक मजा होती लग्न कार्यामुळे माणसे एकत्र यायची एकमेकांचे विचार करायची. आणि बैलगाडी लग्नाच्या दिशेने धावायची परंतु सध्या बैलगाडी क्वचित कुठेतरी दिसून येते गेली चार दिवस हे बैलगाडीचे चित्र मी जपून ठेवले होते. बैलगाडी वरती काहीतरी घ्यावे हा विचार माझ्या डोक्यामध्ये आला. त्यावेळची घुगराची गाडी आणि निसर्ग वर्णन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी हिरव्यागार झाडीचे तट. हे लक्षात येते ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांनी लोकगीते भरपूर गायली आहेत हे लोकगीत मी लहान असताना ऐकले होते.
गाडी चालली घुंगराची, वाट बाई डोंगराची.
पहिल्यांदा गाडीत, बसले मी आज.
कोकणात आहे माहेर माझं, आई बाप माझ दर्याचं राजं.
मला सवय बंदराची….।
दणक्यावर दणका बसतो ग बाई, दणक्यांनी जीव माझा व्याकुळ होई.
इकडच्या सॉरी ला परवाच नाही, या भयान जंगलाची.
गाडी चालली घुंगराची, वाट बाई डोंगराची.
अशी सुंदर सुंदर गीते ऐकली म्हणजे मनाला फार समाधान वाटते. जुन्या गाण्यांमध्ये कितीतरी मोठा अर्थ भरला आहे हे ऐकताना जाणवल्याशिवाय राहत नाही. गायन क्षेत्रामध्ये स्वतःची संपूर्ण आयुष्य प्रल्हाद शिंदे यांनी वेचले. अशी महाराष्ट्रात गाणाऱ्यापैकी प्रल्हाद शिंदे सध्या अजित कडकडे, रोशन सातारकर, जितेंद्र अभिषेकी, जयवंत कुलकर्णी, गगन कोकिळा लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपुर यांची नावे पुढे येतात. या मंडळी आयुष्यभर गाणी गायली आणि अमर सुद्धा झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या अंगी परमेश्वरांन काही ना काही कला दिली आहे कलेच्या माध्यमातून व गाण्याच्या माध्यमातून. या मंडळींनी स्वतःचा ठसा उमटविला आहे असे म्हणाय वावगे ठरणार नाही. कला ही शिकून येत नसते ती जन्मताच अंगी असावी लागते अशी मंडळी महाराष्ट्रामध्ये फार कमी प्रमाणात आहे. हल्ली तर कला शिकवली जात आहे परंतु मुळची कला कुठेच लपत नाही एवढी मात्र निश्चित…।
— दत्तात्रय पांडुरंग मानुगडे, (ग्रामीण कथा लेखक.)
उपाध्यक्ष, भारतीय साहित्य परिषद..।
व्हाट्सअप नंबर,9075273546
Leave a Reply