गाज सागराची धुंद वाऱ्याची
प्रणय गीत मंद सूर झंकारले
तप्त देह भाव गोड मोहकसे
व्याकुळ लोचने अलगद मिटले..
ये प्रिये अलगद अशी जवळी
आस मनात लाज गाली विलसे
स्पर्शात चांदणे बहरुन साजिरे
लाज सोडून देहभान विसर प्रिये..
रोमरोमातून उमटल्या भाव प्रीती
समर्पित तू अलगद होशील प्रिये
अलवार ओठ चुंबीता मी तुझे
फुलतील क्षण मिठीत हळवे बावरे..
प्रणय धुंद गंध मधुर मीलनी
स्पर्शात वीण अबोल मिटे
विरघळून जाशील तू तेव्हा प्रिये
अधर चुंबनात सैलावतील गात्रे..
हात हातात अलगद धरुनी
तुझ्यात विसरलो भान प्रिये
मुग्ध बावरुन प्रीत सर्वांग उमले
मदनाची रती तू शृंगार गाली विलसे..
दोन देही अबोल आस मनी
ये मिठीत तू अलगद प्रिये
ओठ भिडतील ओठांना जेव्हा
गंधाळून जातील स्पर्शात भाव सारे..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply