मुके बसा
कायी सांगु नोका
मायीत हाये आमाले।
गांधी बाबा चा..किती..
पुळका हाये तुमाले।
कायी सांगु नोका..
ते गांधी बाबा चे तीन माकडं।
तुमचं न त्यायचं त
भल्ल हाये वाकडं।
बस झाले तुमचे ते
सूत अन चरखे।
मायीत हाये..गांधीजी
किती आपले न परके।
कायी सांगू नोका..की
गांधीजी हात नोटावर।
रोज लावता थुका…
घेऊन दोन बोटावर।
कायी नोका सांगू आमाले
सत्त्याग्रह अन मिठाचं।
कायले करता कौतुक
काढेल टपाल तिकिटाचं।
कायी हाये तुमी …
म्हणता देश स्वच्छ करू।
अन त्या नावाखाली..
सोताचेच खिसे भरू।
गांधीजीच नाव घेऊन
जाता मतं मांग्याले।
तुमाले तरी समजले का गांधी…
चालले मोठे ..आमाले सांग्याले।
आबे गांधीजी का कोणी माणुस हाये..
ते त विचार धन हाये।
आमचा जीव की प्राण…
आन आमचं मन हाये।
— नारायण जाधव, खामगाव.
Leave a Reply