पं.विनायक केळकर यांनी पं. रामचंद्रबुवा साळी, उस्ताद अझिझुद्दीन खान, पं. आनंदबुवा लिमये अशा बुजुर्गांकडून संगीताची तालीम घेतली होती. या तालमीला त्यांनी स्वत:चा रियाज, परिश्रम, स्वतंत्र विचार यांची जोड देऊन स्वतंत्र शैली घडवली होती. संगीतविषयक सखोल चिंतन, व्यासंग आणि मननातून त्यांनी सादरीकरणाची वेगळी वाट निर्माण केली.
संगीत समीक्षक या नात्याने त्यांनी विविध इंग्रजी तसेच मराठी वृत्तपत्रांतून समीक्षालेखनही केले. आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. व्यवसायाने ते इंजिनिअर असले तरी संगीतक्षेत्रात त्यांनी अनेक उत्तम शिष्य घडवले. अखेरपर्यंत ते विद्यादान करत राहिले. जयपूर घराण्याच्या गायकीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पं. केळकर यांनी अनेक रागांत स्वत: बंदिशी केल्या. आवाज साधनाशास्त्राचा त्यांचा विशेष अभ्यास होता.
विनायक केळकर यांचे २३ जून २०१४ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply