मानसीने नुकतेच दोन वर्ष पूर्ण केले होते. तिच्या सर्व हालचाली मनास खूप प्रसन्नता देत होत्या. तिचे दुडु दुडु पळणे, पडणे, रडणे, हट्ट करणे, कोणत्याही वस्तूला बघणे, हाताळणे, तोडफोड करणे सारे काही तिच्या वाढीचा वेग दर्शवीत होते. मला मात्र एका गोष्टीचे सतत आश्चर्य वाटत होते. हे तिच्या बोबडे बोलण्याचे. ती पूर्ण वाक्ये उच्चारीत होती व भावना तोडक्या मोडक्या शब्दांत व्यक्त करीत होती. बरेच ज्ञान, माहितीही तिने सभोवतालचा परिसर, ह्याच्या संपर्कामधून ग्रहण केली होती. जे ती बघे, ऐके तेच ती पुनुरुच्चारीत असे. हे सारे सामान्य होत. मात्र एक गोष्ट तिव्रतेने जाणवली. ती म्हणजे तिचे टेबल टेनीस खेळावरील प्रेम, ज्ञान व आवड. ते ती सतत व्यक्त करीत असे. समजण्याच्याच काळात तिने त्या खेळाबद्दल बरीच माहिती संकलीत केल्याचे आढळून आले. तसा तीचा दर दिवशी टे.टे. चा संपर्क नव्हता तरी देखील. मात्र एक सत्य होते की तीची आई टे.टे. ची खेळाडू champion होती. तिने जिल्हा, प्रांत यातसुद्धा यश मिळवून देशस्थरावर गेली होती. टे.टे. हा विषय तिच्या रक्तात, मेंदूत पक्यापद्धतीने स्थित व स्थीर झालेला होता. मात्र आजकाल इतर कार्यबाहुल्यांमुळे तिचे टे.टे.कडे फारसे लक्ष नव्हते. तसा तो विषय बाजूस पडला होता. तरी त्याविषय बद्दल मानसीमध्ये निर्माण होणारी आवड attachment मन वेधून घेत होती.
आज अचानक एका शास्त्रिय मासिकांत वाचण्यात आले. नुकत्याच डेन्मार्क येथील वैद्यकीय शास्त्रज्ञाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी सहा हजारपेक्षा जास्त गर्भवती स्त्रिया व नवजात बालके यांचा सखोल अभ्यास व सर्वेक्षण केले होते. बालकामध्ये गर्भात असताना, होणाऱ्या वाढीच्या वेळीच त्याच्या मेंदूची वाढ होत असते. मेंदूचे कार्य हे गर्भात असतानाच सुरु होते. आईकडून येणाऱ्या प्रत्येक चेतना, या त्या नव बालकाच्या मेंदूत देखील साठवणूक होत जातात. आईला बाह्यांगातून अर्थात सभोवताल परिसर येथून ज्या चेतना प्राप्त होतात, त्या जसे आई आपल्या मेंदूत साठविते, त्याचप्रमाणे त्याचवेळी आईच्या मेंदूतून परावर्तीत होत त्या चेतना नव बालकांच्या मेंदूतही साठवणूक करतात. कंप्यूटरच्या भाषेत बोलावयाचे, तर आईच्या कंप्यूटर मेंदूत डाऊनलोड झालेले सर्व विचार अर्थात चेतना बालकाच्याही मेंदूत transfer होऊन तेथेही डाऊनलोड होतात, फिक्स होतात. हे कायम स्वरुपी असतात. मुलाच्या जन्मानंतर त्याच्यात वाढत जाणाऱ्या समजानंतर, भाषेनंतर त्याला पुन्हा display करता येतात. व हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.
अनेक अनेक वर्षापूर्वी महाभारत काळातील अभिमन्यूची कथा जीला पुराण कथा म्हणून संबोधीले गेले होते. अभिमन्यू गर्भात असताना श्री कृष्णाकडून सुभेद्रेने ऐकलेले चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान, हे त्यालाही प्राप्त झाले होते. त्याच्या त्या ज्ञानाचा उपयोग त्याने युद्धासमयी केला. अर्थात ते ज्ञान त्याला पूर्णत: न प्राप्त झाल्याने, त्याचा अंत झाला. कितीतरी कथा ज्या भारतीय संस्कृतीत महाभारत, रामायण इत्यादी ग्रंथात नमुद केलेल्या आहेत व ज्यांना भाकड कथा म्हणून उपहासले गेले. त्याच कथांचे सूत्र, संकल्पना आज विज्ञान सत्त्यतेच्या इमारतीमध्ये प्रदर्शित करत आहे. त्याचा सन्मान, Credit घेत आहेत. पूर्वजांनी आपल्या ज्ञानाने मिळालेल्या अनेक गोष्टी, जसे अस्त्र, शस्त्र, विमान (पुष्पक) आकाशातील भ्रमण, दिव्यदृष्टी, दिव्य श्रवण दृष्टी, अदृश्य होण्याची संकल्पना इत्यादी या एकापाठोपाठ विज्ञान शास्त्राच्या परिभाषेत सत्याकडे झुकत आहेत. आपण आपणास विसरतो व परकिय आपणास सदा श्रेष्ठ वाटत गेले. हे सारे निराशामय वाटते. साठवणूक, विकास व उपयोगींना, असे त्रिकोणातील ही तीन अंगे आहेत. चेतना जर मिळाली तरच साठवणूकीला प्रारंभ होईल. त्यामुळे चेतना ही महत्त्वाची वाटते. वैद्यकीय शास्त्र त्याचमुळे चेतनेची महती गाते. त्याचवेळा शिक्षण क्षेत्रातील मानसशास्त्र त्या चेतनेचे तत्त्वज्ञान मान्य करीत, योग्य व अयोग्य चेतनेचा उहापोह करते. बालकाचा विकास हा नेहमी योग्य अशाच चेतनेमुळे झाला पाहिजे. ज्याला सुसंस्कार म्हणता येईल. चेतनेमुळे मानसिक तणाव ग्रस्तता त्याचवेळी निर्माण होईल, जेव्हा त्या चेतना अहितकारक, असंस्कारीकता किंवा विकसीत होणाऱ्या मेंदूला तो विचार ग्रहण शक्तीच्या मर्यादेबाहेरचा असेल. समजण्याच्या युक्तीच्या बाहेरचा असेल. बालक तो विचार साठवताना एक प्रकारे तणावग्रस्त होईल. त्याला समज येईपर्यंत त्याचे ग्रहण होणार नाही. याच कारणाने हे सर्व शिक्षण क्षेत्र सूचविते की मेंदूची काही अंगे विकसीत होईपर्यंत शिक्षण ही संकल्पना नको. साधारणपणे पाच वर्षे, मुलाना शालेय शिक्षण न देता, त्याच्या आपल्या बुद्धीला परिस्थिती व वातावरणात विकसीत होवू देते. केवळ बाह्य चेतनामय संस्कार त्याच्या पंचेद्रीयावर प्रक्रीया करीत राहतात. साठवणूक होते. हेच तर ज्ञानप्राप्तीचे प्राथमिक द्वार असते. त्याचा प्रथम मुळ असतो निसर्ग. तो मातृत्वाच्या माध्यमातून हे साध्य करतो. विकसीत करतो. बालकाला अवलंबीत्वाच्या धारणेपासून स्वतंत्र जीवन जगण्यासाठी, कला शिकवत असतो. जी पुढे उत्पतीपासून स्थितीकडे व शेवटी लय या संकल्पनेत अंत पावते. मानसीची प्रथम ज्ञान प्राप्ती जरी गर्भातून सुरु झालेली दिसली, तरी तिला तो मार्ग बदलावाच लागतो व ज्ञान वृद्धी तिची तिलाच करावी लागते. तेच तिचे भावी व्यक्तीमत्व ठरेल.
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply