कळावे लोभ असावा ,पत्र मी केले पुरे
कळेल ना खरोखरी , पत्ता कुठचा लिहावा बरे ?
सगळेच गुंग मोबाइलवरी ..मेसेज आणि कॉलवर
मी अडाणी अजून चिपकून ..जुन्याच पत्र चिट्ठीवर
शब्द लेकराचे जपून ठेवले ….वाचते,हात लावते पुन्हा पुन्हा
घड्या करुनी सांभाळते ….त्यात माझा दिसे कान्हा
स्पर्श अक्षरांचा जणू लेकराला थोपटते मी
झोपतो बाळ आन स्वप्न पाहत झोपते मी
केवढा होता सहारा पत्राचा …छान वेळ वाट बघण्यातही
आता तर विसरलाच पत्ता घराचा ..गावचा पोस्टमनही
मोबाईलवर थरथर म्हणुनी बोलणेही होतेच कट
खरे तर नातसुनांना ..वाटते माझी का कटकट
खोटेपणा, फसवेगिरी ..दिसतेच या यंत्रात मला
खास वेळ काढून लिही रे लेकरा एक पत्र मला /
— श्रीकांत पेटकर
Leave a Reply