*गझल*
*वृत्त :- व्योमगंगा*
*लगावली* :- गालगागा गालगागा गालगागा गालगागा
अंगठी बोटातली तो,अंगणी फेकून गेला
साक्षगंधाची समाधी,अंगणी बांधून गेलाआवडीची ना मिळाली,कार त्याच्या ती म्हणोनी;
स्वप्न जे मी पाहिले ते ,अंगणी गाडून गेला” प्रेम माझे फार आहे “, भेटला तेव्हा म्हणाला
मात्र आता सोबतीला,तू नको सांगून गेलादु:ख माझे वाहणारा,भेटला आता मलाही
स्पर्धकाला त्याचिया तो,चोरुनी पाहून गेलाहौस त्याची भागलेली ,पाहता आले न कोणा
लग्न त्याचे मोडले ही, बातमी देवून गेलाश्राप माझा लागला त्याला म्हणे कोणी तरी ते
भेटला लग्नात माझ्या, तो क्षमा मागून गेला© जयवंत वानखडे,कोरपना