ए बाई कुठे भटकतेस उन्हातून
तिने मागे पाहिले , आयला तू इथे काय करतोस,
ह्या गावात . हे तर डोंबिवली गाव नाही
पण शहरही नाही,
ऍन्टी गोबल व्हिलेज म्हण
अर्थात ते पण जास्त आहे कारण ज्या
ठिकाणी रिक्षा मीटरप्रमाणे जात नाहीत
ते व्हिलेज
हे माझे म्हणणे तिला माहीत होते.
मी सांताक्रूजचा आय मीन शहरातला.
आम्ही कॉलेजला एकत्र होतो ,
कॉलेज संपले आणि पांगलो .
त्यावेळी नंबर वगैरे घेतले होते एकमेकांचे
ते चार सहा महिने पुरले.
मग हळूहळू बंद झाले.
चल घरी येतोस, ऊन मजबूत होते.
चल म्हणालो. रिक्षाने गेलो. जरा लांब होते.
एका लहान बंगल्यासमोर थांबलो.
चल आत ये ,
मी फाटक उघडून आत गेलो.
सॉलिड पॉश होता.
कोपऱ्यात कॉंर्नर बार होता.
थांब मी आलेच .
मी घर बघीतले , सॉलिड मालदार पकडला बहुतेक.
विचार करत असताना ती पाणी घेऊन आली.
पाणी पिता पिता मी कॉर्नर बार कडे पाहिले.
ती हसली. थांब पाणी पी
मग
बीअर मारू.
आयला बीअर मारू. तिला माहित होते
मी हार्ड ड्रिंक घेत नाही ते.
आम्ही कॉलेजला असताना
चर्चगेटसमोर त्या मैदानासमोर असलेल्या छोट्या स्वस्त बार मध्ये जात असू.
ग्रुप होता आमचा .
तसे आम्ही दोघेही येत असू.
ही बिन्धास , फुकण्या पण मारायची .
अर्थात मी पण. ..
बोलता बोलता म्हणालो नवरा काय करतो…
अब्रोड़ असतो येतो चार सहा महिन्यांनी.
तू एकटीच.
एस नो मूल बाळ ,
एक झालं होत ..
आठव्या महिन्याच गेली.
मी मग क्लब जॉईन केला.
दादरला..कधी आईकडे कधी इथे.
सॉलिड आहेस.
तुझे काय, ती म्हणाली..
त्रिकोणी कुटूंब आहे…बस एन्जॉय
घंटा एन्जॉय ती हसून म्हणाली
पक्का चॅप्टर आहेस…
मला काय माहीत नाही का…
तुझी बायको माहित आहे,
पूर्वी आपण भेटलो होतो ..
पाच एक वर्षांपूर्वी…
अरे पण ती ख्रिश्चन पोरगी पडकली होती
तिचे काय झाले.
ते काय परमनंट नव्हते ..फुल्ल टी पी होता
असे तुझे किती टी पी होते..
मी म्हणालो तू काय कमी आहेस ..
मालदार मिळाला तू गुल..
तो बिचारा बसला आहे गावाला गाठोडे संभाळत.
हो रे…पण मी नीट विचार केला ..
लाईफचा प्रश्न असतो ना…
बीअर आणू ..
आण ,
नेकी आणि पुछ पुछ
तशाच बाटल्या तोंडाला लावल्या.
सॉलिड गप्पा रंगल्या.
इतक्यात तेच फोन वाजला.
ती कुणाच्या तरी नावाने बोबलात होती.
संभाषण संपले.
मी विचारले कोण होते.
अरे आहे एक बेवडा राजकरणी मागे आहे.
मी त्याला नेहमी टाळते..
म्हणजे तुझे अजून काहीतरी चालू आहेच का ..
मी विचारले ..तसे नाही रे..
पण हे जाम मागे असतात ..
त्यांना वाटते मी हाताला लागेल…घंटा.
तुझा घंटा हा शब्द नाही गेला अजून डोक्यातून..
तेव्हा ती खळखळून हसली.
खूप वेळ बोलत होतो.
मी घड्याळ बघीतले.
तू जाणार सांताक्रूजला थांब…
तिने मोबाईल घेतला..
काहीतरी केले…
थांब रे..
मी ओला बुक केली आहे…
आपण दोघे जाऊ ..मी पुढे दादरला जाईन..
आयला एकदम दणकून निर्णय..
हा तिचा स्वभाव पाहिल्यापासूनचा..
ओला आली ..
तिने घर नीट लावून घेतले..
लॉक केले….
तेथल्या वॉचमन ला काही सागितले ..
आम्ही निघालो…
तुला वेळ आहे…
माझा दुसरा बंगला ..
सांताक्रूजलाही आहे….
मायला …
ही दोन वाक्ये तिने अशी म्हटली…
हो …..
हा शब्द मला
न विचारता
माझ्या तोंडातून बाहेर पडला….?
सतीश चाफेकर.
Leave a Reply