मला सध्याच्या अनेक गोष्टी कळत नाहीत. त्यातलीच ही आणखी एक गोष्ट, म्यानमारमधून भारतात घुसलेल्या रोहींग्या मुसलमानांना, सरळ ‘घुसखोर’ असं न म्हणता रोहींग्या ‘मुसलमान’ असं का म्हणतात? आपल्या घरात घुसलेल्या चोराला आपण त्याचा जात-धर्म विचारतो का? त्याचा उल्लेख ‘मुसलमान चोर’ किंवा ‘हिन्दू चोर’ असा करतो का? की त्याला फटकावून थेट पोलिसांच्या ताब्यात देतो?
अतिरेक्यांना धर्म नसतो, तसा तो घुसखोरांनाही नसतो, असं कुणाला वाटत नाही का? की म्यानमारमधून भारतात घुसलेल्या त्या घुसखोरांच्या आडून त्यांच्या ‘मुसलमान’ असण्याचं राजकारण केलं जात आहे? घुसखोर हा घुसखोरच असतो, असं कुणाच्या मनात कसं येत नाही.
घुसखोरांचा उल्लेख रोहींग्या ‘मुसलमान’ असा न करता, फक्त ‘घुसखोर’ असा केला तर केवढा फरक पडेल बघा..! पण तसं होणार नाही. कारण त्यांच्या मुसलमान असण्याचं सर्वांना भांडवल करुन स्वत:ची पोळी भाजून घ्यायची आहे. याला कुणीही अपवाद नाही.
– नितीन साळुंखे
Leave a Reply