तशी ती काही लहान नाही आणि मोठीही नाही परंतु तिला मात्र आपल्या शरीरात बदल होत आहे हे मात्र जाणवत होते.
तिचे वावरणे मला जाणवत होते , मलाही गम्मत वाटत होती कारण तिचा अभ्यास , तिचे पाठांतर सगळे काही उत्तमच होते. एक वेगळाच बुरखा घेऊन ती वावरत असे मला वाटत असे . अर्थात तिच्या घरच्यांना जाणवत असेल की नाही कोण जाणे . निश्चितपणे ती अत्यंत निटनेटकी रहात होती म्हणजे बऱ्यापैकी वेळ आरशासमोर जात असणार.
पुढे ती पास झाली . दुसरीकडे रहावयास गेली , खरे तर मी तिला विसरूनच गेलो होतो.
……आणि कालच ती मला अचानक भेटली .
जवळजवळ बारा -तेरा वर्षाने . तिने रस्त्याच्या बाजूला गाडी थांबवली आणि हाक मारली , क्षणभर मी तिला ओळखलेच नाही . तिने ओळख दिली तेव्हा आठवले.
काय सर , विसरलात तुम्ही , खरे होते ते मी म्हणालो तुझ्यात सॉलिड बदल झाला आहे आता. काय करते असे विचारल्यावर म्हणाली इथे नसते ऍब्रॉड असते. माझा नवरा तिथेच असतो , आता आईकडे आले आहे.. महिनाभर इथेच आहे . तुमचा फोन नंबर द्याल का , भेटून गप्पा मारू आपल्यावेळचे फारसे भेटले नाहीत अजून कोणी.
मी तिला नंबर दिला , भेट म्हणून तिथून निघून गेलो.
असे अनेकदा अनेकजण भेटत मला , शिक्षकी पेशा असल्यामुळे असे अनेक वेळा घडते काही फोन करतात , तर काही विसरतात , तेव्हढ्याचपुरते असते ते , नेहमीचेच असते. मी इतके काही मनावर घेत नाही.
चार-सहा दिवस गेले आणि तिचा फोन आला , भेटणार का म्हणून विचारले , म्हणालो आज भेटू , संध्याकाळी , घरी ये , ती म्हणाली नको आज आपण हॉटेलमध्ये जाऊ , तेथे मस्तपणे गप्पा मारता येतील.
संध्याकाळी भेटलो , गाडी घेऊनच आली होती . हॉटेल बाहेर जरा लांब असल्यामुळे जास्त गर्दी नव्हती. अनेकजणांच्या चौकशा झाल्या , कोण कोण काय करते ह्याबद्दल चर्चा झाली , आम्ही कसे बावळट होतो ते पण सांगून झाले आणि अचानक म्हणाली सर , माझा प्रॉब्लेम झाला आहे आहे , काय झाले . मला धमाल लाईफ जगायचे आहे. कुठलेही बंधन नको मला . माझ्याकडे सर्वकाही आहे पण कुठेतरी ते जास्तच होत आहे असे मला वाटते . मी समजलो नाही , मी म्हणालो . तसे नाही परंतु काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या , कसे सांगू हेच कळत नाही . आय वॉन्ट समथिंग चेज . मला त्या शब्दातली घाई आणि जोश दिसून आला खरा , पण तो कितपत खरा असेल हे नीट समजले नाही . मी माझ्या मनात तुला काय इतके चागले असून भिकेचे डोहाळे लागले आहेत. तेच ती म्हणाली सर पैसे आहे , सर्व काही आहे , पण कुठेतरी राहून गेले आहे असे मला वाटते. नवरा ठीक आहे ना असे विचारले , तेव्हा ती म्हणाली त्याला माझ्याकडे वेळ द्यायला वेळ आहे कुठे आहे. तो सतत फिरत असतो, त्याचे तेथे दोन मोठे बिझनेस आहेत. त्याचे प्रायव्हेट लाईफ वेगळे आणि माझेही.
मनात आले काही तरी या पोरीची गडबड दिसते.
तू काही लफडे केलं नाहीस ना.
लफडे असे नाही परंतु आहे पण आणि नाही पण.
ए बाई सर्व नीट सांग , कोड्यात बोलू नको .
तेथे एक मुलगा आहे २२ वर्षाचा त्याबरोबर.
मी डोक्यावर हात मारला .
नेहमीप्रमाणे शिवी हासडून तिला बोललॊ अरे असे काही करू नकोस.
…कुणाला काय कळतंय , तिथे एकदम फ्री असते , कुणीही कुणाच्या भानगडीत पडत आंही. तो कॉलेजमध्ये जातो.
असाच भेटला होता तो एकदा एका मॉलमध्ये तिथेच ओळख झाली, आणि वाढलीही.
तिच्या वाढलीही ह्या शब्दातील जागा मला कळली.
सर तुम्हाला म्हणून विचारते , काय करू ?
डोकं आपट भिंतीवर मी चिडून म्हणालो.
तशी ती सीरियसली सांगा. तुम्हालाच फक्त हे बोलले आहे , असे म्हणाली
हे प्रकरण वाढले कसे , ती म्हणाली असेच दोन-तीनदा भेटलो .
हाय हॅलो , ह्ग करताना जाणवले , आणि फरकही कळतो ‘ गुड टच आणि बॅड टच ‘ मधला.
मी एकदम चूप. मनात आले काय उत्तर द्याचे तिला , काहीच समजत नवहते.
त्या मुलाचे म्हणणे काय आहे . ती म्हणाली त्याचे काहीच नाही तो रेडी आहे .
कशाला
लग्न करायला.
मी पार हेलपाटलोच.
मी शेवटी तिला म्हणालो तुला ‘ गुड टच आणि बॅड टच ‘ मधला फरक कळतो.
आणि खरे लाईफ फार वेगळे असते . हे बघ मला वाटते तू वाटल्यास तसेच ठेव परंतु , परंत लग्न वगैरेच्या भानगडीत पडू नकोस.
आमची बरीच चर्चा झाली. पटकन ती म्हणाली तुमच्या आयुष्यात असे कधी घडले आहे का कधी.
मी पार हडबडलो , अर्थात माझे मुलांशी-मुलींशी सर्व विषयांवर चर्चा होत असे , अगदी खुलेपणे
परंतु खरेच विचार करू लागलो .
माझेही झाले असेल कधीतरी माणूस आहे ना मी.
तशी ती हसली … म्हणाली सर तुम्ही माठ आहात आणि परत हसली.
का हसली हे मला कळलेच नाही.
ती डायरेक्स्ट माठ म्हणाली मला , राग आला परंतु मी तो आवरला.
काय काय झाले , मी तिला विचारले.
सांगू का , तुम्हाला आठवतंय का , एकदा रस्त्यात मला पायाला लागले म्हणून तुम्ही मला उचलले ‘
आणि माझा तुम्हाला मला स्पर्श झाला
परंतु तुम्हाला त्या वेळी ‘ गुड टच आणि बॅड टच ‘ मधला फरक नाही कळला .
आता मात्र माझी फुल विकेट होती.
ती म्हणाली एक सांगू , माझे कुठेही लफडे नाही , कोणीही माझ्या आयुष्यात नाही.
पण त्या दिवशी तुम्हाला पाहिले आणि मला तो माझा
‘ गुड टच ‘ मला आठवला. मग म्हणून ही स्टोरी केली. कशी काय वाटली .
इतके म्ह्णून खळखळून हसली.
मी पार फ्लॅट झालो. मी मग तिला नेहमीप्रमाणे नेहमीप्रमाणे शिव्या हासडल्या.
तेव्हा ती म्हणाली खरे तर मला या तुमच्या शिव्या ऐकायच्या होत्या , कान तृप्त झाले
मग बऱ्याच गप्पा झाल्या.
तशी ती म्हणाली मी बिल देते. तिने बिल दिले .
जाताना शेक हॅन्ड झाल्यावर हात न सोडता म्हणाली .
सर स्टील
‘ गुड टच ‘ .
तशी ती खळखळून हसू लागली आणि… मीही……
सतीश चाफेकर
Leave a Reply