इयत्ता नववी मध्ये ८६% मिळवून सईने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला.राणीला एवढ वाईट वाटलं नव्हत तसं, कारण नववीच्या वर्षाचा शेवटचा गणिताचा पेपर तिला खूप कठीण गेला होता तेपण फक्त एका गणितामुळे. त्या एका गणितामध्ये ४२/२१ ला भाग लावायचा होता.याच सोपं उत्तर असतानाही राणी बाईने याचं उत्तरं २१ असं काढल होत का तर ४२ मधल्या ४ चे अर्धे २ आणि २ चा अर्धा १..ते गणित करताना ती कोणत्या विचारात होती ते पेपर नंतर तिलाच कळेना..नववी मध्ये आलेल्या दुसऱ्या क्रमांकामुळे राणीची आई मात्र चिंतेत पडली होती तिने राणीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत दहावीसाठी कोचिंग क्लास शोधून काढायचं ठरवल. राणी काही तयार नव्हती कोचिंगसाठी पण आईपुढे कोणाचं चालत…?
आईने क्लास शोधला तो पण एकदम लांब. बिचारी राणी येण्याजाण्यामधेच थकून जायची पण क्लास मात्र आईचे अगदी योग्य निवडला होता. राणीचा नववीमध्ये द्वितीय क्रमांक आल्यामुळे राणीकडे विशेष लक्ष दिल जात होत.तिच्या वर्गामधली अर्ध्यापेक्षा जास्त मुलं गौरव नावाच्या क्लास मध्ये होते.गौरव क्लास ची खूप ख्याती होती,पहिले क्रमांक नेहमी त्यांच्या मुलांचेच यायचे.राणीचा क्लास आणि गौरव क्लास यांच्यात स्पर्धा रंगणार होती यावर्षी.सई गौरव क्लास ची होती,हूशार आणि मेहनती. राणी आणि सई दोघी शाळेत एकाच बाकड्यावर बसणाऱ्या खास मैत्रिणी होत्या.आपल्यापरीने त्या दोघी स्वतःचे १००% अभ्यासाला द्यायच्या.बोर्डाच्या परीक्षेच्या आधीच्या सर्व परीक्षांमध्ये दोघींना जवळ जवळ सारखेचं गुण मिळाले होते.त्यामुळे कोणाला कळत नव्हत पहिला क्रमांक नक्की कोण पटकवेल आणि त्यातच खरी मज्जा होती.राणी सई सोबत अजून ३ ४ मुलं होती जी त्यांना टक्कर देऊ शकणार होती.अशा स्पर्धात्मक वातावरणात शेवटी बोर्डाच्या परीक्षा आल्या.सगळे परीक्षेच्या तयारीमध्ये व्यस्त झाले.
परीक्षेनंतर मोठी सुट्टी पडली.राणीच्या बऱ्याच मित्रमैत्रिणी गावाला गेल्या.राणीच्या गावी कोणीच नव्हत,तिचे सगळे नातेवाईक मुंबई मधेच स्थायिक होते.मग ती मुंबईच्या तिच्या मावशांकडे राहायला गेली.तिथेपण तिच्या निकालाविषयी सगळ्यांना कुतूहल होत.आई बाबा दोन्हीकडच्या कुटूंबामध्ये राणीच हुशार होती.राणीला पेपर तर खूप छान गेले होते.पण तरी दडपण आलं होत निकालाच.सुट्टीचा काहीतरी सदुपयोग करायला हवा अस राणीने ठरवले.तिच्या सोबतचे बरेच लोक MS-CIT लावत होते.तिला इच्छा नव्हती ते लावायची कारण तिला संगणक बऱ्यापैकी येत होत.तिच्या मोठ्या बहिणीने तिला ओरडून ओरडून ते शिकवलं होत.तिला संगणकामध्ये जास्त गोडी नव्हती तिला वाटायचं संगणकाचा शोध तर माणसाने लावला आहे मग का आपण त्याला एवढ महत्व देतोय,अस मानून ती टाळाटाळ करायची.मन काही काही मानत नव्हतं MS-CIT करायला पण सगळा तिचा मित्र परिवार MS-CIT लावतोय बघून ती चिंतीत पडली.बघता बघता निकालाची वेळ जवळ आली.
१ वाजता निकाल लागणार होता.राणीच्या आईची सकाळपासून लगबग सुरु.राणी पूर्ण चिंताग्रहीत.शाळेमध्ये एक फळा होता.त्यामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव लिहली जायची.राणीच स्वप्न होत तिचे नाव त्या फळावर असावं.सकाळपासून तिने काही खाल्ल नव्हत भीतीने.
घड्याळात १ वाजला.निकाल इंटरनेट वर कळणार होता. राणीची बहीण तिला इंटरनेट वर बघून निकाल सांगणार होती.दुपारी १.१५ ला पहिला फोन आला तो होता सई चा तीला ९४.३६% मिळाले होते.आता मात्र राणीच्या पोटात मोठा गोळा आला होता. ती ताईच्या फोन ची वाट बघायला लागली.आईची स्थिती पण राणीसारखीच होती. १.२५ ला ताई चा फोन आला. ती मोठ्याने ओरडली राणी तुला ९४. आणि मध्ये आवाजच गेला ताईचा आणि फोन कट झाला.राणी खुपंच अस्वस्थ झाली. सई पेक्षा कमी असतील की जास्त… सगळी मेहनत,तो फळा एकाएकी तिच्या समोर आला.ताई चा परत फोन आला.राणीने तो आईच्या हातात दिला.आई ने गुण ऐकूण राणीला मोठी मिठी मारली आणि तिला तू ९४.९१% मिळवले अस ओरडून सांगितलं.काही दशांशच्या फरकाने राणीने बाजी मारली होती.राणी खूप खुश झाली.तिने आईला घट्ट मिठी मारली आणि तिचे आनंदाश्रू कोसळू लागले.
राणीने पुढे काय केलं?..MS-CIT न घेऊन ती पचतावली का?..पुढच्या तिच्या महाविद्यालयीन आयुष्यात काय काय घडल?..कोणी नवीन ओळखी आयुष्यात आल्या का?
या सगळ्यांची उत्तर घेऊन मी येईन माझ्या पुढच्या सदरात…हे सदर कस वाटलं ते नक्की कळवा…
धन्यवाद!!
Leave a Reply