कादंबरी हे एक न सुटणार कोडं असतं,
अनेक जीव आपले जीवनपट उलगडून सांगत असतात !
प्रत्येकाच आयुष्य ही स्वत:च्या हाताने लिहिलेली आणि “त्याच्या” बहुतेक कसोट्यांवर उतरणारी सर्वात श्रेष्ठ आणि मस्त कादंबरी असते,
आणि ज्याच्या त्याच्या कर्माची एक गोष्टरुपी कादंबरी ठरते,
जी बेस्टसेलर म्हणून कित्येक वर्षे त्याच्या मृत्य नंतर गाजत राहते !
जीवनाचा सारा प्रवास कुठल्याही विरोधा शिवाय पार पडावा असं वाटत असलं,
तरी अडचणींवर आणि संकटांवर मात केल्याशिवाय नशीब उजळत नसतं !
कादंबरीची सुरुवात, मध्य आणि शेवट हा लेखकाने ठरवायचा नसतो,
कादंबरीतील पात्रांच्या भूत, वर्तमान आणि भविष्यकाळाच्या चढ उतारावर अवलंबून असतो !
म्हणून कडू, गोड आणि रहस्यमय आठवणीने संपायला पाहिजे असा काय कुठे नियम नसतो !
— जगदीश पटवर्धन, दादर (प)
Leave a Reply