वळून बघता पूर्व आयुष्यी, प्रखरतेने हेची जाणले
घडले नाही कधीही ते ते, हवे असूनी मनी योजीले….१
सभोवतालची देखूनी स्थिती, आखती योजना कल्पकतेने
खेळामधली चाल नियतीची, ध्यानी न येते दुर्दैवाने…..२
मार्ग तिचे हे ठरले असूनी, बांधलेले इतर जीवांशी
अपूर्व योजना निसर्गाची, कळेल कुणाला सहज कशी….३
जाळीतल्या धाग्याची टोके, गुंतली असती ग्रह गोलाशी
फिरता फिरता खेच पडे, वा ढीली होवून जाती कशी…..४
सुख दु:खाचे परिणाम हे, असेच दिसून येती मग
अनपेक्षीत हे जेव्हा घडते, म्हणती त्यासी दैवी अंग….५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply