श्रावण महिना म्हणजे जिकडे तिकडे हिरवागार परिसर ओढे नदी नाले पाऊस भरपूर असल्यामुळे खळखळ वाहत असतात. तर काही वेळा महापूर येण्याची सुद्धा शक्यता असते या महिन्यांमध्ये सर्वत्र आनंदी आनंदतरळत असतो. या नागपंचमीला लग्न झालेल्या नवक्या मुली माहेरहून सासरला येतात घरात मुली आल्या म्हणजे घर गजबजून जाते. या महिन्यामध्ये पोषक वातावरण पावसाची रिमझिम तर सारखी चालू असते. पाऊस चालू झाला म्हणजे पावसाच्या रिमझिम मध्ये लहान मुले मुली घराच्या बाहेर पटांगणामध्ये आनंदाने गाणे म्हणतात….।
,,, येरे येरे पावसा, तुला देतो पैसा.
,,, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा.
निसर्गाप्रमाणेच मुलांना सुद्धा आनंद होतो घरातूनच आई ओरडते.
,,, ये मुलांनो लवकर घरात या बाहेर पाऊस पडायला लागला आहे. सर्दी पडसे खोकला येईल..।
पण ही मुले कोणाचेच ऐकत नाहीत लहान मुले व माकडे सारखीच की. सगळीकडे आनंदी आनंद याच श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, शिरळोबा, राखी बंधन, असे सन येत असतात. पाऊस चालू झाला म्हणजे घरामध्ये गोडगोड अन्नाचा घास घरात आनंद आणि बाहेर सुद्धा आनंद असे हे वातावरण म्हणजे श्रावण महिना होय..।
… नागपंचमी सणाला ग्रामीण भागामध्ये विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नागपंचमी म्हणजे नागाची पूजा करणे ही पूजा सवासिनी स्त्रिया हातामध्ये ताट ताटामध्ये दुधाची वाटी. साखर कापसाच्या वाती पासून तयार केलेली पावते उदबत्ती हळदी कुंकू भिजवणे आरती ताटात फुले. व पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन गावाच्या बाहेर जिथे वारूळ आहे तेथे जाऊन. नागाची पूजा करत असतात हा आनंद स्त्रियांना फार होतो पूजा झाल्यानंतर हात जोडून नागोबाला म्हणतात. नागराजा आमच्या घरावर तुझं लक्ष असू दे माझ्या पतीला भरपूर आयुष्य दे व माझा संसार सोन्यासारखा चालू दे. अशी प्रार्थना करून एका मागे एक स्त्री नागोबाची पूजा करून घरी येते. समजा गावांमध्ये नागराज्याचे वारूळ नसेल तर भिंतीवर चार फडयाचा किंवा बाराफडयाचे चित्र काढून. आजूबाजूला नक्षी तयार करून एका छोट्या लाकडाच्या काठीला हळदीत मळलेली पोवते बांधून. घरीच पूजा करतात घरी गोडधोड पुरणपोळीचा स्वयंपाक करून आनंदाने जेवण करतात…।
…. झाडाला झोपाळा बांधून काही स्त्रिया झोपाळ्यावर बसून अंगामध्ये नवीन वस्त्र परिधान करून झोके घेत असतात. तर काही ठिकाणी लाकडाची झीग तयार करून तेथे सुद्धा फार मोठा झोका बांधलेला असतो. त्या जगावर स्पीकर लावलेला असतो आणि याच आनंदात नागपंचमीच्या सणाचा आनंद घेत सर्वजण झोके घेण्याचा आनंद घेत असतो. तर काही गावांमध्ये मेन देवळाच्या मंदिरामध्ये नाभिक समाजातील व्यक्ती चिखलापासून फार मोठा नाग तयार करून. दिवसभर देवळात थांबलेला असतो गावातील स्त्रिया या नागोबाला सुद्धा मनोभावे पुजन करतात. तेव्हा सुद्धा त्यांच्या ताटामध्ये पूजेची सर्व साहित्य हे असतेच नागोबाला उदबत्ती लावून लाह्या नागोबाच्या पुढे टाकतात. अशी जुनी पद्धत अजून सुद्धा आहे दिवसभर मिळालेल्या पोळ्यामध्ये नाभिक समाजातील माणूस पोळ्याची अर्धी बुट्टी कुंभाराला देऊन टाकतो. व अर्धी बुट्टी सायंकाळी सहा वाजता नागोबा विसर्जन करून त्याच्या घरी जातो. त्याला भरपूर पोळ्या भात व पैसे सुद्धा मिळतात त्याच्यावर तो सायंकाळी आनंदाने त्याच्या घरी जातो…।
… दिवसभर झोका खेळून नवख्या मुली घरापुढे फेर धरून गाणी म्हणतात..
,,, चल ग सये वारुळाला, नागोबाला पुजायाला.
.. किंवा फिंग्याचा खेळ सुद्धा खेळतात आणि म्हणतात..
,, सूट बूट घातलेला भाऊ माझा, जावई तुझा ग पोरी पिंगा..
अशा विषयाची गाणी बरीच वेळ चाललेली असतात वरील पाऊस गार गार वारा याची पर्वा न करता या मुली आनंद व्यक्त करतात. याच्यासारखा कोणता आनंद असू शकतो नागपंचमी, गौरी गणपती, राखी पौर्णिमा, भाऊबीज अशा मोठ्या सणांना नांदायला गेलेल्या मुली 100% माहेरी येतातच. असे मोठे सण आले म्हणजे या मुलींना माहेरची ओढ लागते आईला कधी भेटेल माझे बाबा काय करत असतील. माझा भाऊ काय करतो वहिनी काय करते अशा विचाराने त्या मुलीचे मन आठवणीने चिंब चिंब होऊन जाते. काही सणाची गाणी ही अतिशय महत्त्वपूर्ण असतात ही गाणी कोणी लिहिली हे मला माहित नाही. पण ह्या मुली सणाच्या दिवशी गाणी म्हणतात प्रत्येक गाण्यांमध्ये एक अर्थ दडला आहे असे मला वाटते. ग्रामीण भागामध्ये वरील लिहिल्याप्रमाणे त्या त्या सणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. उदाहरणार्थ बैलपोळा घ्या मकर संक्रात घ्या प्रत्येक सणालाहे महत्त्व प्राप्त झालेच आहे….।
……. पूर्णविराम……।
— दत्तात्रय मानुगडे.
Leave a Reply