हिलाच अमृतवेल असे देखील म्हणतात कारण हिचे कार्य आणी औषधी उपयोग पाहिल्या हि खरोखरच अमृता समान काम करते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
गुळवेलीचे बहुवर्षायु वेल असतात.हे वेल निंब,आंबा अशा वृक्षांच्या आधाराने वाढते.हिच्या त्वचेचा वरचा भाग पातळ व ठिसूळ असून धुरकट पिवळा दिसतो जो सोलल्यावर आत हिरवा व मांसल दिसतो.ह्याची पाने हृदयाकार व स्निग्ध असतात.ह्याचे फळ वाटाण्यासारखे मांसल,गुळगुळीत व पिकल्यावर लाल होते.
ह्याचे उपयुक्तांग आहे काण्ड व पाने.गुळवेल चवीला कडू,तिखट,तुरट असून उष्ण गुणाची असते.हि ताजी असता स्निग्ध,व मृदू असते तर वाळविल्यावर कोरडी,हल्की व मृदू असते.गुळवेल त्रिदोषशामक आहे.
आता आपण ह्याचे काही औषधी उपयोग पाहूयात:
१)त्वचा रोगात गुळवेलीने सिध्द केलेले तेल वापरतात.
२)गुळवेल शरीरामधील सात ही धातूंवर चांगले कार्य करते व त्यांचे पोषण उत्तमरित्या करून शरीरात रसायन म्हणून कार्य करते.
३)अम्लपित्तामध्ये गुळवेलीचा काढा मधासह उपयुक्त आहे.
४)कावीळ झाली असता गुळवेलीच्या पानांचा रस साखरे सह चांगला उपयुक्त ठरतो.
५)आमवातामध्ये गुळवेलीचा काढा सुंठी सोबत चांगला काम करतो.
६)डायबेटीस,ताप ह्यात देखील गुळवेलीचा चांगला उपयोग होतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply