हलकेच सख्या मी रानात
चोर पावलांनी अशी येते
वाट तुझी पाहता मी
बैचेन जराशी मग होते
येतो तू असा समोरुन
भान हरपून माझे जाते
जवळ येता तू माझ्या
मी मोहरुन पुरती जाते
घेता मिठीत अलवार तू मजला
क्षण फुलून अलगद जातो
ओठ ओठांनी अधर तू टिपता
साखर चुंबनात भाव गंधाळतो
सोडशी गाठ तू मग चोळीची
पदर लाज सोडून वाऱ्यावरी जातो
न उरले बंधन कसले दोघांत काही
नजर खुणावे माझी अर्थ तुजला लागतो
तो शृंगार खुलला त्या धुंद वेळी
सैलावली मी मोहक भावनांनी
डोळे मिटले मी त्या लाज वेळी
एकरुप झाले दोन मन मोहरुनी
साखर मिठीत मज तू घट्ट घेता
मी समर्पित तुझ्यात अलवार होते
तृप्त झालास तू त्या धुंद मिलनी
ती पहाट गोड गुलाबी नशिली होते
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply