हि वनस्पती पाणथळ प्रदेशात व डोंगराळ भागात उगवणारी आहे.हि ०.५-१.५ सेंमी उंचीचे क्षुप असते.पाने गुळगुळीत,तांबूस काळी व पर्णदंडावर उगवतात.हि १-३ सेंमी लांब असून ह्याच्या मागील भागावर काळ्या रंगाचे बीजाणू असतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे पंचांग.ह्याची चव तुरट असून ती थंड गुणाची व जड असते.हि कफ पित्तनाशक आहे.
आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू:
१)जळजळ व जखम ह्यात हिचा लेप करतात.
२)हंसपदी जुलाब होत असल्यास देखील उपयुक्त आहे.
३)हंसपदी घसा बसणे,सर्दी,खोकला,दमा ह्यात देखील उपयुक्त आहे.
४)लघ्वीच्या त्रासात देखील हिचा चांगला उपयोग होतो.
५)हंसपदी रक्तस्राव होत असल्यास तो थांबावायला उपयोगी आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply