हव्यास जीवाला किती असावा
माझे तर माझेच एकटयाचे आहे
इतरत्र देखील माझा हक्क आहे
सांगा कोण काय घेवून जाणार आहे।।
बेताल व्यर्थ वक्तव्ये काय कामाची
उपकारांची जाणीव संस्कार आहे
जनाची नाही मनाची लाज असावी
संस्कारहीन स्वार्थ, दुर्बुद्धीच आहे।।
माणुस म्हणुनी थोडेसे तरी जगावे
जन्म मानवी विवेकी लाभला आहे
हव्यासी, लालसी वृत्तीच विनाशी
सारे सारेच इथे सोडूनी जायचे आहे।।
जे भाळी आहे ते सहज चालत येते
जे नाही ते सारे दुर्लभ असणार आहे
अंतिम, सत्य जसे आहे तसे पुढे येते
दयाघनी घाव अनाहत अटळ आहे।।
सत्कर्म, निरपेक्ष सदा करीत रहावे
दुष्कर्म इथेच फेडावे लागणार आहे
जीवाचाच क्षणाचाही भरवसां नाही
नि:स्वार्थी प्रेमभाव निर्मळ शांती आहे।।
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १३५.
१८ – ५ – २०२२.
Leave a Reply