१९७० ते १९८५ या कालावधीत त्यांनी संगीतकार म्हणून संगीत क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. अनपढ, दामाद, धरती आकाश, नजराना प्यार का, राजा योगी, टॅक्सीी टॅक्सीन, बॅरिस्टर, तेरी मेरी कहानी, आया रंगीला सावन अशा काही हिंदी चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी संगीत दिले. “शारद सुंदर चंदेरी राती‘, “बाळा माझ्या नीज ना‘, “मी ही अशी भोळी कशी गं‘, “जा जा जा रे नको बोलू‘ ही त्यांची मराठीतील गाजलेली गाणी आहेत.
“शारद सुंदर चंदेरी राती‘ हे गाणे आशाताईंनी गायले आहे. संगीतकार म्हणून हेमंत भोसले यांनी आपली छाप चांगली उमटवली होती. आशा भोसले यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव व लता दिदींचे भाचा..हेमंत भोसले यांचे २८ सप्टेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकी पिडीया
हेमंत भोसले यांनी संगीत दिलेली काही गाणी
मीही अशी भोळी कशी ग ?
भोळी खुळी !
मी लाजले, जे मना वाटले-
ते राहिले माझ्या
Leave a Reply