ह्या नवीन सदरा मध्ये आपण आयुर्वेदामध्ये वापरल्या जाणाऱ्या उपयुक्त अशा काही वनस्पतींची माहीती जाणून घेऊयात.
आपल्या पैकी बऱ्याच मंडळींना पुष्कळ वनस्पती तसेच त्याचे उपयोग माहीत देखील असतील पण काही गोष्टींची उजळणी करणे ही कल्पना देखील वाईट नाही हो ना.
हो अजून एक मुख्य गोष्ट नमूद करायचे राहीलेच की!
जरी आपण इथे काही वनस्पतींची माहीती वाचत असलात तरी त्याचा वापर कसा करावा हे ह्या सदरामध्ये सांगितले जाणार नाही अर्थात आम्ही आयुर्वेदामध्ये ज्याला आमयिक प्रयोग म्हणतो तो इथे दिला जाणार नाही ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी.
हा लेख फक्त माहीती पर असल्याने इथे सांगितलेली वनस्पती ही प्रत्येक वाचकांना वैद्यांचा सल्ला घेऊनच उपयोगात आणावी हि वाचकांना नम्र विनंती.
तर मग ह्या सदराची सुरूवात श्री गणरायांना नमन करून त्यांनाच अर्पण केल्या जाणाऱ्या पत्री पासून केली तर उत्तमच नाही का?
Leave a Reply