लाल जास्वंद हि आपल्या लाडक्या श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे.प्रत्येकाच्या अंगणात हि हमखास आढळते.आजकाल ह्याचे कलम करून अनेक रंगांची,अनेक जातींची जास्वंद आपल्याला पहायला मिळते.पण जी गावठी जास्वंद लाल किंवा पांढऱ्या रंगाची असते तिच औषधी असते.त्यामुळे औषधी उपयोगीकरिता तिच वापरली जाते.
जास्वंदीचा अनेक शाखा प्रशाखायुक्त गुल्म असतो.ह्याची पाने लट्वाकार,स्निग्ध,चमकदार,लांब टोकाची,खाली अखंड व वर दन्तुर कडा असलेली असते.फुले प्रामुख्याने लाल रंगाची,एकल,घंटाकार ४-६ इंच व्यासाची असतात.ह्यातून स्त्री व पुंकेसर बाहेर निघतात.फळ लांबट गोल व अनेक बीज युक्त असते ३/४ इंच लांब असते.
आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात.हि तुरट,कडू चवीची असून थंड गुणाची व कोरडी व रूक्ष असते.हि कफपित्तशामक आहे.
आता आपण ह्याचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)केस गळणे व पिकणे ह्यात जास्वंदीची फुले गोमुत्रात वाटून लेप लावतात.
२)स्रियांना अंगावर लाल न पांढरे जाते ह्यात जास्वंदीच्या कळ्या दुधात वाटून तिला प्यायला देतात.
३)जास्वंदीच्या फुलांचा उपयोग रक्तस्त्राव थांबवायला होतो.
४)जास्वंदीच्या फुलांनी सिद्ध केलेले तेल हे केसांच्या आरोग्याकरिता उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply