नवीन लेखन...

प्रसिद्ध हिंदी गीतकार हसरत जयपुरी

Hindi Poet and Lyricist Hasrat Jaipuri

प्रसिद्ध हिंदी गीतकार मा. हसरत जयपुरी यांचे खरे नाव इक्बाल हुसेन होते. हसरत जयपुरी हे जयपुरचे. त्यांचा जन्म १५ एप्रिल १९१८ रोजी झाला. कॉलेज मधे असताना शेरोशायरी चा जबरदस्त नाद लागला आणि हसरत जयपुरी या टोपण नावाने प्रसिध्द झाले.

हसरत जयपुरी हे जयपुरहून मुंबईत आल्यावर उदर निर्वाहासाठी बेस्टमधे कंडक्टर ची नोकरी स्विकारली. ते ऑपेरा हाऊस समोर खेळणी विकत असत. एके दिवशी म्युनिसीपालटीने त्यांची गाडी जप्त केली. अश्या अनेक अडचणीला तोंड देत असताना हिम्मत हारली नाही. कवी संमेलन, मुशायरा यात भाग घेतच राहीले. असाच एक मुशायरा असताना त्या ठिकाणी पृथ्वीराज आणि राजकपूर आले होते. हसरत यांची शायरी ऐकून प्रभावित झालेल्या पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या नाटक कंपनीत यायचे आमंत्रण दिले. इथे त्यांचे राजकपूर बरोबर सूर जुळले. राजकपूरच्या पहिल्या सिनेमात आग मधे त्यांना गाणे लिहायला मिळाले नाही. पण बरसात मधे त्यांची गाणी सर्वप्रथम सिनेमात आली. त्याचे पहिले गाणे जीया बेकरार है रेकॉर्ड झाले तेव्हा ते सुपर सिनेमात बुकिंग क्लँर्क होते. बरसात पासून शैलेंद्र, हसरत, शंकर, जयकिशन अशी विलक्षण चौकट जमली आणि राजकपूर चा परिस स्पर्श लाभला आणि ही चौकट रसिकांच्या मनात घट्ट बसली. बरसात ते कल आज और कल पर्यंत आर.के.फिल्म च्या प्रवासात शैलेंद्र आणि हसरत यांची घनीष्ट मैत्री शैलेंद्र च्या जाण्यापर्यंत अतूट होती. शंकर जयकिशन ते राहूल देव बर्मन पर्यैत असंख्य रोमँन्टीक रचना त्यांनी केल्या .त्यांचे सुपुत्र अख्तर जन्मल्यावर त्यांना पहायला गेले असताना अख्तर च्या डोळ्याकडे पाहून त्यांना सुचलेले तेरी प्यारी प्यारी सुरतको कितीतरी वर्षे रसिकांच्या ओठावर होते. त्यांच्या बहिणीचे लग्न ठरवताना आलेल्या अडचणी मुळे तिला नैराश्य आले. तिला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी लिहीले सुनो छोटीसी गुडियाकी लंबी कहानी, कॉलेज मधे असताना राधा नावाच्या हिंदू प्रेयसीला लिहीलेले यह मेरा प्रेमपत्र पढकर गीत संगम मधे आले. मा. हसरत जयपुरी यांनी ६५ पेक्षा अधिक संगीतकारांबरोबर काम केले. मा. हसरत जयपुरी यांनी सगळ्यात जास्त गाणी संगीतकार शंकर जयकिशन यांच्या साठी केली. बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है’ व में ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला

हसरत जयपुरी यांनी आपल्या कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपटात २००० पेक्षा जास्त गीते लिहिली. जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी यांची अभेद्य जोडी होती. हसरतसाहेबांच्या लेखणीतून प्रणयी गीतांचा जणू ओघच चालू असायचा आणि जयकिशन त्या गीतांना अशा काही आकर्षक चाली लावीत, की ऐकणारा बाकीचे सगळे विसरून गीत ऐकत बसत असे याचा. जयकिशन यांच्या कन्या आणि मुंबईच्या अग्रगण्य फॅशन डिझायनर भैरवी जयकिशन यांनी आपल्या वडिलांचे वर्णन करताना म्हटले आहे की, माझे वडील ज्या पद्धतीने जीवन जगले त्याच्याच आधारे हसरत जयपुरींनी ‘अंदाज’मधील (१९७१) ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना’ हे शीर्षकगीत लिहिले.

हसरत जयपुरी यांचे १७ सप्टेंबर १९९९ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

हसरत जयपुरी यांची काही गाणी


https://www.youtube.com/watch?v=CmK-CaDdQRI

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..