शेजारच्या फ्लँटमधे रंगकाम काढल होत. अपेक्षेप्रमाणे तीन-चार यूपी बिहारकडचे हिंदीभाषिक रंगारी लाकडी घोडा (शिडी) आणि रंगांच्या डब्यांसकट सकाळी दहाच्या सुमारास आले. म्होरक्यानी बेल वाजवताच बाईंनी ग्रिलच्या दरवाज्यातुन “कोण पाहिजेय?” विचारल. बाईंना हिंदीत उत्तर मिळाल “हम,पेंटर है”. बाई आठवुन आठवुन हिंदी बोलायचा प्रयत्न करु लागल्या.
” हमारे ‘हे’ अभी घरमे,नही है; कचेरी गये है. हमको बोलके गये है की कोई लोग पेंटींग करने आएंगे. आप शांतीसे रंगकाम चालु करो लेकिन भिंत घासते टाईम जादा धुळ नही उडनी चाहिये. दार खुल्लही रखो तो धुळ बाहर जाएंगी. दुसरी बात, रंग टिकना चाहीये और भिंतीके पोपडे बिलकुल नही निकलने चाहिये. पिछली बार पेंटरोने घाईघाईमे खराब रंगकाम किया ओर सब पोपडे हमको खरवडने पडते थे……”
मी पुढील संभाषण ऐकण्याच टाळल कारण बाईंच हिंदी ऐकुन “मै खुद बहुत बावचळ गया था.”
— प्रकाश तांबे
8600478883
तुम बहुत बावळट हो गये इसका कारण उस स्त्री ने हिन्मराठी भाषा मे भाषण किया था।