हिराबाई बडोदेकर ख्याल, ठुमरी, मराठी नाट्य संगीत, भजन मध्ये तज्ज्ञ होत्या. त्यांचा जन्म १९ मे १९०५ रोजी झाला.
त्यांना लोकांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. त्यांच्या मैफिली अतिशय लोकप्रिय होत असत.त्यांचा गोड आणि नाजूक आवाज खूप लोकप्रिय होते.
हिराबाई बडोदेकर यांनी किराणा घराण्याला अधिक लोकप्रिय करण्याचे काम केले. हिराबाई बडोदेकर यांनी सुवर्णा मंदिर, प्रतिभा, जनाबाई अशा अनेक चित्रपटात अभिनय केला. संगीत शिकवण्यासाठी संगीत विद्यालय, नूतन संगीत विद्यालय नावाने सुरू केले. हिराबाई ह्या फार लवकरच्या कारकिर्दीत रेकॉर्डिंग कलाकार झाल्या. ध्वनिमुद्रिकांच्या द्वारे आणि रेडिओवर नित्यनियमाने होणा-या कार्यक्रमांमुळे हिराबाई खूपच लोकप्रिय झाल्या. नाटयसंगीताच्या हिराबाईंच्या सुमारे ४८ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या, चित्रपटसंगीताच्या अवघ्या तीनच ध्वनिमुद्रिका निघाल्या. शास्त्रीय संगीताच्या सुमारे चाळीस ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. तसेच ‘राधेकृष्ण बोल’, ‘गिरीधर गोपाला’,खमाज, ‘पायोरे मैने’ दुर्गा, ‘चाकर राखोजी’, यासारखी भजने आहेत. पाच ठुम-या आहेत तर, ‘किस कदर है’, ‘या आकर हुआ मेहमान’, या गझला आहेत.
हिराबाईंचा भैरवी हा आवडता राग होता. १९७० पर्यंत हिराबाईंच्या सुमारे १७५ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या. हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या, त्या १९२९ मध्ये रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली हो. ती त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या.
ध्वनीमुद्रिका आणि आकाशवाणी ही दोन प्रभावी माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे हिराबाईंच्या सुरेल गीतांचा सुगंध दुरवर तर पसरलाच परंतू आजच्या पिढीत त्यांची गाणी रसिक आवर्जून ऐकतात.
हिराबाई बडोदेकर यांचे २० नोव्हेंबर १९८९ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपिडीया
छान माहिती उपलब्ध झाली.शस्त्रिय गायन ,गायक,त्यांची घराणी याबद्दल या उपक्रमातून चांगली माहिती मिळते.नवोदित कलाकारांना याचा चांगला फायदा होईल …