नवीन लेखन...

वडापावाचा इतिहास….

आपण सकाळ-संध्याकाळी पोटाची भूक भागवण्यासाठी ‘वडापाव’ खातो, अगदी स्वस्तात मिळणारे हे अन्न आणि चालता पळता ते खाऊ शकतो, यामुळे वडापाव खुप प्रसिद्ध आहे. पण या वडापावचा शोध कोणी लावला ? याचा कधी विचार केला आहे का ?

वडापावचा ज्यांनी शोध लावला त्या कमलाबाई ओगले यांची ओळख करून देत आहोत..

1965-70 चा काळ होता, कमलाबाई मुंबईतील दादर येथे राहत होत्या. उन्हाळ्याचे दिवस होते, पाव्हणे घरी आले म्हणून त्यांनी स्वयंपाक केला होता. बटाट्याची सुकी भाजी, भजे,पुरणपोळी वगैरे.. स्वयंपाक करताना त्यांनी बटाट्याची सुकी भाजी भज्याच्या पिठात टाकून तेलात सोडली, तर एक वेगळाच पदार्थ तयार झाला. त्यांनी तो पदार्थ खाऊन बघितला तर अगदी खमंग लागला. त्यांनी त्याला ‘वडा’ हे नाव दिले. नविन पदार्थ असल्यामुळे त्यांनी तो लोकांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या हेतूने घरापुढेच विकण्यास मांडला, जेव्हा लोक येऊन खाऊ लागले तर लोकांनाही खुप आवडला, पुढे पुढे मारवाडी हाॅटेलवाल्यांनी त्यांची ही कल्पना चोरली आणि त्यांच्या नावाने मुंबईत वडे विकू लागले. त्या सोबत सुरवातीला चपाती देत असत, धावपळीच्या मुंबई मधे चपाती सोबत कशी न्यावी म्हणून चहासोबतच्या पावासोबत वडा विकला जाऊ लागला. त्यांची कलाकृती चोरली हे पाहील्यानंतर त्यांनी ‘रूचिरा’ हा पाककृतीचा छोटेखानी पुस्तीका लिहली, आजही पाककृती मधे ‘कमलाबाई ओगले’ यांच्या ‘रूचिरा’ चा विक्रम कोणी मोडू शकले नाही.

अशा या आज्जीचा वयाच्या 86 व्या वर्षी 1999 साली पुण्यात निधन झाले. आज या आज्जीबद्दल कोणाला माहीत नाही म्हणून तुम्हास ओळख करून देत आहे..

2 Comments on वडापावाचा इतिहास….

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..