टीम इंडियाचा माजी खेळाडू व्ही.व्ही.एस लक्ष्मणचा जन्म १ नोव्हेंबर १९७४ रोजी हैदराबाद येथे झाला.
भारताच्या संघाचा कसोटी सामन्यातील सर्वात महान फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मण याला आपलं क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एमबीबीएसचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होते. लक्ष्मणला कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे संकटमोचक म्हणूनच ओळखले जायचे. क्रिकेट जगतात एक वेळ अशी होती की या व्हेरी व्हेरी स्पेशल फलंदाजाला ऑस्ट्रेलिया संघ घाबरत होता. लक्ष्मणने आपल्या करिअरमध्ये सर्वात अधिक धावा ऑस्ट्रेलियाविरूद्ध २,४३४ इतक्या धावा काढल्या आहेत. त्याने कसोटीत कंगारू विरूद्ध ६ शतके तर १२ अर्धशतके ठोकले आहेत. कोलकता येथे झालेल्या सामन्यात २८१ धावांची खेळी करून त्याने भारताला विजय मिळवून दिला होता. २००२ मध्ये ‘बेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर’ म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. लक्ष्मणसाठी कोलकत्यामधील ईडन गार्डन्स हे मैदान नेहमी लकी ठरले. त्याने या मैदानावर ११०.६३ च्या सरासरीने १,२१७ धावा काढल्या आहेत. हा पहिला आणि एकच असा खेळाडू आहे ज्याने एकाच मैदानात १००पेक्षा अधिक सरासरीने १ हजारपेक्षा अधिक धावा काढल्या आहेत. १३४ कसोटी व ८८ एकदिवसीय सामने खेळणाऱ्या लक्ष्मणने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने संघाला विजय मिळवून दिले असून अनेकवेळा संकटातून बाहेरही काढले आहे. ईडन गार्डन कोलकाता मैदानावर २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची २८१ धावांची खेळी कसोटीतील सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक मानली जाते. त्याने करिअरमध्ये १० हजारपेक्षा अधिक धावा तर २३ शतक ठोकले आहेत.
लक्ष्मणबद्दल एक गोष्ट कदाचित त्याच्या चाहत्यांना माहित नसेल ती म्हणजे तो भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा भाचा आहे. २०११ मध्ये लक्ष्मणला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता क्रिकेट समालोचकाच्या नव्या भूमिकेत लक्ष्मण दिसत आहे.
— संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply