नवीन लेखन...

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Infertility in women from the perspective of ayurveda

प्रजांकुर नस्य चिकित्सा – विश्लेषण:

पंचकर्मांपैकी किमान विरेचन, नस्य आणि बस्ति चिकित्सेचा प्रयोग करावा. बीजदोष नाहीसे करण्यासाठी, बीज सामर्थ्यवान होण्यासाठी व उत्तम गर्भधारणा होण्यासाठी ह्या क्रिया आवश्यक आहेत.

हायपोथॅलॅमस, पियुशिका ग्रंथी आणि बीजकोशातून स्रावित होणाऱ्या संप्रेरकांचा समतोल स्त्रीच्या प्रजनन यंत्रणेला प्रामुख्याने उपयुक्त असतो. हायपोथॅलॅमस मधून गोनडोट्रॉपिन रीलीझिंग हॉर्मोन उत्पन्न होते. त्याचा प्रभाव फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोनवर होतो ज्यामुळे मासिक रजःस्रावाचे चक्र वयाच्या १२ – १४ व्या वर्षापासून (पौगंडावस्थेपासून) ५० – ५२ वर्षे वयापर्यंत (रजोनिवृत्तीपर्यंत) चालू राहते. ह्यांच्या संतुलनामुळे स्त्रीबीज प्रवर्तन, परिपक्वता आणि बीजकोशातून इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन निर्मिती होते. ह्यांच्याच प्रभावाने स्तनपुष्टी, गर्भाशयाची वाढ, योनिमार्गातील ओलावा निर्माण होतो. ‘एन्डोमेट्रिऑसिस’ (गर्भाशयाची अन्तस्त्वचा इतरत्र पसरणे) विकाराची चिकित्सा करण्यासाठी एक प्रकारच्या रासायनिक द्रव्याचे नस्य (स्प्रेच्या रूपाने) आधुनिक वैद्यक शास्त्रात दिले जाते. नासामार्गे प्रविष्ट केलेल्या ह्या औषधाने हॉर्मोन्सचे संतुलन साधले जाते व सदर रोगाची चिकित्सा सफल होते. ह्यातून निष्कर्ष काढता येतो की नस्य चिकित्सेचा उपयोग स्त्री प्रजनन यंत्रणेवर हमखास होतो. ह्या विषयी आयुर्वेदीय ग्रंथात नमूद असलेल्या “गर्भस्थापक” नस्याचा विचार नक्कीच शास्त्राच्या भक्कम सूत्रांवर आधारित आहे हेही स्पष्ट होते.

नस्य चिकित्सेची ही महती आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी जाणून उपयुक्त वनस्पतींचे पाठ ग्रंथात विषद केले. त्यांना नव्याने अभ्यासून व शास्त्राच्या चौकटीत बसवून “प्रजांकुर नस्य” सिद्ध घृत स्वरुपात अक्षय फार्मा रेमेडीजने सादर केले आहे. ह्याचा वापर नस्य स्वरुपात गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भधारणा निश्चिती पर्यंत उभयतांनी करावयाचा आहे.

चरक संहिता ह्या आद्य ग्रंथात महर्षी चरकाचार्यांनी काही विशिष्ट वनस्पतींचे वर्गीकरण ‘गर्भस्थापक औषधी’ म्हणून केले आहे. ह्याचे समर्थन काश्यप संहिता, सुश्रुत संहिता अशा ग्रंथातही नमूद आहे. ‘औषधी गर्भसंस्कार’ संकल्पनेचा आधार ग्रंथ “अष्टांगहृदय” ह्यामध्ये देखील महर्षी वाग्भट ह्यांनी त्याचे समर्थन करून औषध सेवनाचे विविध मार्ग व स्वरूप सांगितले आहे.

नस्याचे लाभ –

ततः प्रजास्थापनाख्या दशौषधीः शिरसा दक्षिणेन च पाणिना धारयेत्। एताभिश्च सिद्धं पयो घृतं वा पिबेत्।
. . . . अष्टांगसंग्रह शारीर १ – ६२
ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याऽमोघाऽव्यथाशिवाऽरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति
. . . . सूत्रस्थान चरक ४/१८ (४९)
लक्ष्मणादिनस्यदानं गर्भस्थापनार्थं, स्थितगर्भायाश्चमासत्रयाल्पान्तरे पुत्रापत्यजननार्थं नस्यदानमिति ll
. . . . . . . सुश्रुत, शारीर २-३२

“पिण्यासाठी व शिरोभागी धारण करण्यासाठी” सदर पाठाचा वापर करावा असा शास्त्रादेश आहे. शिरोभागी धारण करणे म्हणजेच ‘नस्य स्वरुपात वापर करणे’ असा अर्थ शास्त्रकारांना येथे अभिप्रेत आहे. “नासाहि शिरसो द्वारं” ह्या प्रस्थापित संकल्पनेनुसार व आधुनिक वैद्यकानुसारही नस्य हे प्रजनन संस्थेवर उत्तम कार्य करते. म्हणून ‘प्रजांकुर घृत’ नस्य रूपाने वापरावे. शास्त्राधार व आप्तवचन ह्या दोन्ही दृष्टिकोनातून ह्याचा वापर नस्य स्वरुपात करणे योग्यच आहे. काही द्रव्यांचे शोषण नाकाच्या मार्गाने त्वरित होते. हीच द्रव्ये पोटात घेतल्याने त्यावर अनेक पाचक स्रावांची क्रिया घडते व ‘ब्लड ब्रेन बॅरियर’ यंत्रणेमुळे कार्यकारी घटकांचे शोषण शिरोभागात होण्यास अडथळे निर्माण होतात. नाकाच्या श्लेष्मल स्तरातून ही द्रव्ये मेंदूच्या संपर्कात येतात व रसरक्तातही त्यांचे शोषण त्वरित होते. नाकातून प्रविष्ट केलेले द्रव्य अत्यल्प काळात रक्तसंवहनात पसरते. इंजेक्शन द्वारा दिल्या गेलेल्या औषधाइतक्याच कमी वेळात ह्याचा परिणाम होतो.

घृत हेच माध्यम का ?
नस्य चिकित्सेत चूर्ण वापरल्यास नाकाच्या श्लेष्मल त्वचेत व्यवस्थितपणे शोषले जात नाही म्हणून नस्य हे द्रव स्वरुपात असावे. द्रव पदार्थांमध्ये जल आणि स्नेह असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी स्निग्ध द्रव्य (स्नेह) हे स्वभावतः मध्यवर्ती मज्जासंस्थेला सात्म्य असतात.
स्निग्ध द्रव्यांतील भिन्न घटक हे बीजकोशाची प्रजनन क्षमता वाढविण्यात निपुण असतात. ह्यात फिश ऑईल, ऑलिव्ह ऑईल अशा स्निग्ध द्रव्यांचा समावेश आधुनिक वैद्यक शास्त्रात केला आहे. भारतात तूप निर्माण करण्याचे शास्त्र पुरातन काळापासून अवगत आहे. आयुर्वेदात ह्याला घृत म्हणतात. तुपामध्ये डिकोसाहेग्झिनॉइक अॅसिड (DHA) म्हणजे ओमेगा – 3, ह्याशिवाय ओमेगा – ६ सारखे प्रजनन क्षमता वाढविणारे उत्तम घटक आहेत. प्रसुतीच्यावेळी DHA योग्य प्रमाणात असणाऱ्या स्त्रियांची मुले ह्याचे प्रमाण कमी असलेल्या स्त्रियांच्या मुलांपेक्षा बौद्धिकदृष्ट्या जास्त सक्षम असतात. वजन वाढण्याच्या भीतीने ह्याचे सेवन हळूहळू कमी होत आहे. त्यामुळे कदाचित वंध्यत्वाचे प्रमाणही वाढत असावे. आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा, मज्जा हे ४ स्निग्ध पदार्थ आहेत. ह्यापैकी ‘सामान्य-विशेष’ सिद्धांतानुसार ‘मज्जा’ हा स्निग्ध पदार्थ मध्यवर्ती मज्जासंस्थेला (CNS) नक्कीच अधिक पोषक ठरेल ह्यात शंका नाही. परंतु उपलब्धी, प्राणिज स्रोत, मनुष्याची मानसिकता आणि घृताचे गुण ह्यांचा विचार करून “घृत” हेच माध्यम नस्यासाठी वापरणे योग्य ठरते.

प्रजांकुर घृत नस्य –
प्रत्येक १० ग्रॅम प्रजांकुर घृतामधील घटकद्रव्ये व प्रमाण:
ऐन्द्री (Citrullus colocynthis), दुर्वा (Cynodon dactylon), अमोघा (Sterospermum suaveolens), विश्वक्सेना (Callicarpa macrophylla), अव्यथा (Hibiscus mutabilis), शिवा (Terminalia chubula), ब्राह्मी (Bacopa monnieri), वाट्यपुष्पी (Sida cordifolia), शतवीर्या (Asparagus racemosus), बहुपाद (Ficus benghalensis) प्रत्येकी २५० मिलिग्रॅम; गो घृत १० ग्रॅम; गो दुग्ध ४० ग्रॅम
वापरण्याची पद्धत (पुरुष व स्त्रियांसाठी) : बाटली प्रथम गरम पाण्यात ठेवून प्रजांकुर (घृत) पातळ करावे. पाठीवर झोपून ६ – ६ थेंब दोन्ही नाकपुड्यांत सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी टाकावे. २ – ३ मिनिटे तसेच पडून राहावे. गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भनिश्चिती पर्यंत हे नस्य करावे.

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

1 Comment on स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..