नवीन लेखन...

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Infertility in women from the perspective of ayurveda

फलमाह (विलेपित वटी) :

मञ्जिष्ठाकुष्ठतगरत्रिफलाशर्करावचाः ॥
द्वे निशे मधुकं मेदां दीप्यकं कटुरोहिणीम् । पयस्याहिङ्गुकाकोलीवाजिगन्धाशतावरीः ॥
पिष्ट्वाक्षांशा घृतप्रस्थं पचेत्क्षीरचतुर्गुणम् । योनिशुक्रप्रदोषेषु तत्सर्वेषु प्रशस्यते ॥
आयुष्यं पौष्टिकं मेध्यं धन्यं पुंसवनं परम् । फलसर्पिरिति ख्यातं पुष्पे पीतं फलाय यत् ॥
म्रियमाणप्रजानां च गर्भिणीनां च पूजितम् । एतत्परं च बालानां ग्रहघ्नं देहवर्धनम् ॥
. . . . अष्टांग हृदय, उत्तरस्थान ३४/६३ – ६७

ह्याचे सेवन सर्वप्रकारचे योनिदोष व शुक्रदोष ह्यासाठी हितावह आहे. हे आयुष्यवर्धक, पौष्टिक, बुद्धिवर्धक, धनवर्धक व उत्तम पुंसवन आहे. ऋतुकाळी घेतले असता गर्भधारणा होते म्हणून यास फलसर्पि असे म्हणतात. ज्या स्त्रियांची मुले जगत नाहीत त्यांस व गरोदर स्त्रियांस हे हितावह आहे. हे मुलांच्या ग्रहावर उत्तम असून त्याने त्यांचे शरीर चांगले पुष्ट होते.

“फलमाह” हा पाठ अष्टांगहृदयात नमूद “फलसर्पि” मधील वनस्पतींनी निर्माण केला आहे. ह्या पाठातील वनस्पतींनी स्त्रीशरीराची रोग प्रतिकार क्षमता उत्तम प्रकारे वाढते, पेशी रक्षणाचे व स्त्रीबीज बलवर्धनाचे कार्य घडते. रजःप्रवृत्ती अजिबात न होणे किंवा अनियमित असण्याने स्त्रीबीज परिपक्व न होणे ह्यातून घडणाऱ्या वंध्यत्वावर उत्तम परिणाम करणारा हा स्वयंसिद्ध ग्रंथोक्त कल्प आहे. ह्यातील वनस्पती मोबाईल व इतर विद्युतचुंबकीय लहरींपासून प्रजनन यंत्रणेत कार्यरत असलेल्या अवयवांचे संरक्षण व संप्रेरकांचे संतुलन करतात. गर्भाशयात उत्पन्न होणाऱ्या ग्रंथींवरही (Uterine fibroids) ह्यातील वनस्पती उत्तम नियंत्रण करतात.

मानवाने सेवन केलेल्या प्रत्येक घटकाचा परिणाम हा शरीरातील प्रत्येक पेशीवर होत असतो किंबहुना सर्व पेशींची जडणघडणच आहारातून किंवा औषधातून होत असते. आहारातून काही दोषयुक्त पदार्थ सेवन केले गेले तर त्याचा परिणाम इतर शारीरिक पेशींवर जसा होतो तसाच स्त्री बीजकोशातील बीजांवरसुद्धा होतो. ह्या बीजांना दोषमुक्त करण्यासाठी आयुर्वेदाच्या तिजोरीतला एक मौल्यवान पाठ म्हणजेच “फलमाह”. ह्या पाठामध्ये असलेल्या प्रत्येक वनस्पतीचा उपयोग सुलभ गर्भधारणेसाठी व पुढे गर्भस्थैर्यासाठी नेमका कसा होतो?

“फलमाह” – विज्ञाननिष्ठ निरूपण:

गर्भावस्थेत क्ष-किरणांचा अनिष्ट परिणाम गर्भावर होतो हे आता सिद्ध झाले आहे. दैनंदिन जीवनात आजकाल आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन उपकरणांचा वापर वाढत आहे. मोबाईल फोन, मायक्रोवेव्ह, अनेक प्रकारची विद्युत उपकरणे, वाय फाय, फ्लुरोसंट ट्यूबलाईट, कॉर्डलेस फोन, ब्लूटूथ ह्या व अशा अनेक उपकरणांपासून विद्युत-चुंबकीय लहरी निर्माण होतात. शिवाय वातावरणात देखील अनेक प्रकारचे किरणोत्सर्जन सातत्याने चालूच असते. ह्या लहरींमुळे पेशींमधील डी एन ए वर आघात होतो. परिणामी पेशींची विकृत वाढ झपाट्याने होऊ लागते. ही वाढ कॅन्सर स्वरुपाची पण होऊ शकते. विद्युत-चुंबकीय लहरींचा विपरीत परिणाम स्त्रीच्या प्रजनन संस्थेवर होतो. गर्भिणी व गर्भ ह्या दोहोंवर ह्या लहरींचा होणारा परिणाम ह्या विषयी काही संशोधन –

१) मायक्रोवेव्ह, हेअर ड्रायर, मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह असणारे क्षेत्र अशा ठिकाणी काम करणाऱ्या गर्भिणींच्या बालकाला लहान वयातच दमा होण्याची शक्यता तीनपट अधिक असते

२) गर्भिणी व गर्भ दोघांनाही मोबाईल फोन व टॉवर ह्यातून निर्माण होणाऱ्या लहरींच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यातील किरणोत्सर्जामुळे गर्भवाढीसाठी कार्य करणा-या सूक्ष्म पेशींवर आघात होतो. वार (Placenta) ही गर्भरक्षणासाठी निसर्गनिर्मित रचना असते. ह्या लहरी, वारीचे संरक्षक कवच भेदून गर्भपात किंवा गर्भव्यंग उत्पन्न करू शकतात. गर्भावस्थेत ह्या लहरींचा परिणाम झालेल्या बालकात पुढे पौगंडावस्थेत मानसिक दोष निर्माण होतात.

ह्या उपकरणांपासून दूर राहणे तर आता शक्यच नाही. मग ह्याचे दुष्परिणाम कमी कसे करता येतील? काही संरक्षक कवच वनस्पतींपासून आपण मिळवू शकतो का? किरणोत्सर्जना पासून गर्भिणीचे व गर्भाचे संरक्षण कसे साधता येईल? “फलमाह” पाठातील वनस्पतींचे लाभ गर्भधारणेपुर्वी व गर्भावस्थेत आहेतच. शिवाय विद्युत-चुंबकीय लहरींचा दुष्परिणाम टाळण्यासाठी देखील होण्याची शक्यता आहे. ह्याविषयी जगभरात झालेल्या संशोधनातून प्राप्त झालेले काही निवडक निष्कर्ष, माहिती व प्रत्येक वनस्पतीच्या गुणधर्मांचे थोडक्यात वर्णन पाहूया.

मंजिष्ठा: मंजिष्ठा वनस्पतीत अलिझारिन नामक एक लाल रंगाचे द्रव्य असते ज्यामुळे रक्तपेशींमधील बीजदोष अर्थात विषारी परमाणु (फ्री रॅडिकल्स) आघातामुळे डी. एन. ए. वर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. ही वनस्पती विद्युत-चुंबकीय लहरींचा आघात ६७% इतक्या प्रमाणात कमी करू शकते.

अक्कलकारा: ह्याच्या सेवनाने ल्युटिनायझिंग हॉर्मोन व फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन नामक अन्तःस्रावी ग्रंथींच्या स्रावांचे सुयोग्य संतुलन राखले जाते. स्त्रियांच्या बीजकोशामध्ये दडलेले बीज योग्यवेळी परिपक्व होण्यासाठी पियुशिका ग्रंथीच्या पुढच्या भागातून स्रवणाऱ्या ह्या हॉर्मोनची नितांत गरज असते. ह्याने एच.ए. टायटर आणि IgG मध्ये वाढ होऊन रोगप्रतिकारक्षमता उत्तम राखली जाते. अशाप्रकारे अक्कलकारा स्त्रीबीज परिपक्वतेच्या कार्यात निपुण आहे.

तगर: गर्भाशयाच्या पेशींवर अवसादक कार्य तगराने होते म्हणजेच आकुंचन प्रसरण क्रिया ह्याने शांत होते. त्याचबरोबर प्रोस्टाग्लानडिन वरही अवसादक कार्य होत असल्याने सूज व वेदना शमन करण्याचे कार्य ह्याने साधते. ह्या वनस्पतीतील पेशीरक्षक गुण प्रसिद्ध आहेत व त्यांची क्रिया मुख्यतः मेंदुच्या कोषिकांवर होते. मानसिक ताण, निद्रानाश, चंचलता अशा लक्षणांवर अत्यंत उपयुक्त आहे. तगर मूळ उत्तम रेडिओ प्रोटेकटिव्ह असून किरणोत्सर्जजन्य विविध दुष्परिणाम पेशीतील डी.एन.ए. वर होऊ देत नाही.

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

1 Comment on स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..