इंटरॅशनल बिझनेस मशिन्स कॉर्पोरेशन म्हणजेच आय.बी.एम. ही आयटी क्षेत्रातील जगात दुसर्या क्रमांकाची कंपनी म्हणून जगजाहीर आहे.
“आयबीएमचा सेल्समन अथवा कर्मचारी क्षणाला काही न काही विकत असतो” हे वॅटसनचे वाक्य मात्र आपल्याला विचार करायला लावते.
“कॉंप्युटिंग टॅब्युलटिंग रेकॉर्डिंग” या कंपनीची स्थापना १५ जून १९११ मध्ये स्थापना झाली आणि १९१४ मध्ये हिचा टर्न ओव्हर होता सुमारे ४२ लाख डॉलर्स, ती उलाढाल १९१७ मध्ये ८३ लाख डॉलर्स झाली. ती कशी? साधारण १९१२ च्या सुमारास या कंपनीत थॉमस वॅटसन नावाचा एक माणूस ही कंपनी चालवत होता. सुरुवातीला “कॉंप्युटिंग टॅब्युलटिंग रेकॉर्डिंग” कंपनी विचित्र तर्हेाची कामं करी. खाटीक लोकांसाठी वापरायचे तराजू, मांस कापण्यासाठी वापरण्यात येणारे सुरे,कॉफ़ी ग्रांइडर्स अशी उत्पादने ही कंपनी करायची, म्हणजे सर्वच सरमिसळ होती. पण यातूनच पुढे कोणता धंदा जोरदार चालेल याची कल्पना वॅटसनला होती. एके दिवशी काय झाले, वॅटसन घरी आला आणि सांगितले,”आता आपल्या कंपनीचे नाव बदलून इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स ठेवायचे आहे.” घरातले चरकलेच, एवढिशी जागा आणि नाव इंटरनॅशनल? कसं शक्य आहे हे? आणि उत्पादने काय ? तर खाटकाचा तराजू, सुर्याव, घड्याळे…. पण वॅटसन मागे हटला नाही, त्याला जगातील मोठी कंपनी काढायचीच होती आणि तीच पुढे झाली इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स कंपनी म्हणजेच आयबीएम होय. टॅब्युलेटिंग मशिन्सकडे वॅटसनने पुर्ण लक्ष दिले म्हणुनच तर १९२९ च्या मंदीत इतर अमेरिकन उद्योग मागोमाग बंद होत असताना हीच आयबीएम मात्र भराभर वाढत होती. मंदीनंतर १९३४ मध्ये वॅटसनचा पगार वर्षाला ३,६४,४३२ डॉलर्स होता आणि त्यावेळचा तो जगातील सर्वात जास्त पगार होता. १९३७ साली अमेरिकेत “वेजेस अवर्स अक्ट” पास झाला आणि त्यामुळे आयबीएमने कर्मचार्यांगची कामाचे तास आणि दिला जाणारा पगार यांचा हिशेब ठेवणारं “मार्क वन” नावाचं यंत्र बाजारात आणलं. पुढे १९४७ साली “सिलेक्टिव सिक्वेन्स इलेक्ट्रॉनिक्स कॅल्क्युलेटर” बाजारात आणला आयबीएमनेच.
वॅट्सनने त्याची स्वतःची काही कामाची मुल्ये कधी बदलली नाहीत. पहिला, आयबीएमने उत्पादीत केलेली यंत्रे सुरुवातीस “लीज”वर देत असे, पूर्ण विकत नसे. दुसरा, आयबीएममध्ये सेल्समध्ये काम करणार्यां लोकांना महत्व देई. आयबीएमचे सेल्समन इतके हुशार असतात की लोक म्हणतात,” आयबीएमचे सेल्समन ध्रुवीय प्रदेशात रहाणार्या एस्किमोंनाही रेफ्रिजरेटर विकून दाखवतील.” कॉंप्युटरच्या बाबतीत आघाडीवर असलेली ही कंपनी सुरुवातीला मात्र या बाबतीत फ़ारच उदासीन होती. वॅटसनला याच्या बाबतीत फ़ारस स्वारस्य नव्हते. १९४३ साली ‘अख्ख्या जगाला फक्त ५ कॉंप्युटर पुरेसे आहेत’ असं वॅटसन म्हणाला होता.
वॅटसनने आपल्या मुलाचे नावही थॉमसच ठेवलं. आपल्याकडे शक्यतो वडीलांचे नाव मुलाला देत नाहीत पण अमेरिकेत हे सर्रास चालतं. म्हणूनच बाप-लेकांची जोडगोळी उद्योग जगतात चमकली, ती हीच थॉमस वॅटसन (सिनियर) आणि थॉमस वॅटसन (ज्युनियर). वडीलांनी उद्योगाची वेल लावली आणि त्याचा वटवृक्ष केला त्यांच्या मुलाने.सिनियर वॅटसनच्या छोट्या कंपनीचे रुपांतर अवाढव्य कंपनीत केलं ते ज्युनियर वॅटसननं.
१९५८ सालाआधी कामगारांना दर ताशी पगार मिळे, तो आयबीएमने आठवड्याचा केला. तसेच कामगारांना पगारी रजा देण्यामध्ये असणार्या पहिल्या काही कंपन्यांमध्ये आयबीएम एक होती. जेव्हा ज्युनियर वॅट्सन या उद्योगात शिरला तेव्हा कर्मचार्यांची संख्या होती २२४९२. नंतर १९५६ साली हीच संख्या झाली ७२५०६, पुढच्या वर्षी कंपनीची उलाढाल झाली १०० कोटी डॉलर्स. त्याच्या दहा वर्षांनी आयबीएममध्ये २,६५,४९३ कर्मचारी झाले, तेच १९८४ मध्ये ४,९०,००० झाले होते. वॅटसनचा सर्वात महत्वाचा निर्णय ठरला तो “सिस्टीम ३६०” कॉंप्युटर. तो बनवायला तब्बल ५०० कोटी डॉलर्स म्हणजे एक अणुबॉंबपेक्षाही जास्त खर्च आला होता. म्हणूनच यासाठी त्याने त्याचे सर्वस्व पणाला लावले होती, जगाचं लक्ष या उत्पादनाच्या यशस्वीतेकडे लागून राहिले होते. पण हे उत्पादन प्रचंड लोकप्रिय झालं आणि आयबीएमची घोडदौड सुरु झाली.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply