२७ डिसेंबर २०१० रोजी डेल स्टेनचा झेल घेऊन त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २०० झेल पूर्ण केले. यष्टीरक्षकाव्यतिरिक्त अशी कामगिरी करणारा तो पहिलाच. कसोटी कारकिर्दीत १२,००० हून अधिक धावा आजवर केवळ तिघेच जमवू शकले आहेत. हा टप्पा गाठणारा सर्वात अलीकडचा खेळाडू तोच आहे.२१ जुलै २०१० रोजी त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २७००० व्या चेंडूचा सामना केला. आणखी दोन चेंडूंचा सामना करून त्याने अॅलन बॉर्डरच्या विक्रमाशी बरोबरी केली. आजमितीला सर्वाधिक कसोटी चेंडूंचा सामना करण्याचा विक्रम (२८,४९२) त्याच्या नावावर आहे.१४ फेब्रुवारी २००७ रोजी त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील १०,००० धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय आहे.कसोटीचा अधिकृत दर्जा असलेल्या सर्व देशांमध्ये शतक काढण्याची कामगिरी करणारा तो पहिला आणि आजमितीस एकमेव खेळाडू आहे.कसोटी कारकिर्दीत ८५ हून अधिक वेळा तो शतकीय भागीदार्यांमधील एक भिडू राहिलेला आहे. हा विश्वविक्रम आहे.गांगुलीच्या कप्तानीखाली भारताने जिंकलेल्या २१ कसोटी सामन्यांमधील एकूण धावांपैकी सुमारे २३% धावा एकट्या द्रविडने काढलेल्या होत्या ! वीसहून अधिक सामने जिंकणार्या कुठल्याही कर्णधाराच्या सहकार्याबाबतीत हा विश्वविक्रम आहे.पदार्पणापासून ओळीने संघाने खेळलेल्या सर्वाधिक कसोट्यांमध्ये खेळण्याचा भारतीय विक्रम. ओळीने ९३ कसोट्यांमध्ये सहभागी (अधिक १ कसोटी आयसीसी संघासाठी). विश्वविक्रम अॅडम गिल्क्रिस्टच्या नावे (९६).भारतातर्फे कसोट्यांमधील दुसर्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी. लाहोरमध्ये पाकिस्तानविरुद्ध वीरेंदर सेहवागसोबत ४१० धावा. कर्णधार आणि उपकर्णधारामधील सर्वोच्च कसोटी भागीदारी.सलग चार कसोटी डावांमध्ये शतके ठोकण्याचा पराक्रम. (जॅक फिंगल्टन आणि अॅलन मेलव्हिल यां
ीही असा पराक्रम केलेला आहे.) वेस्ट इंडीजच्या इवर्टन विक्सने सलग पाच डावांमध्ये शतके काढलेली आहेत.परदेशी खेळपट्ट्यांवर सर्वाधिक कसोटी धावा काढण्याच्या बाबतीत त्याच्या पुढे फक्त सचिन तेंडुलकरच (७१६५) आहे.९४ सामन्यांमधून १५० डाव त्याने क्रमांक ३ चा फलंदाज म्हणून खेळलेले आहेत आणि ८००० हून अधिक धावा
काढलेल्या आहेत. दोन्ही विश्वविक्रम आहेत.गावसकरांनंतर
एका कसोटीच्या दोन्ही डावात शतके अशी कामगिरी दोनदा करणारा एकमेव भारतीय. गावसकर आणि पाँटिंग यांनी असा पराक्रम तीन-तीनदा केलेला आहे.३०० हून अधिक धावांची भागीदारी एकदिवसीय सामन्यांमध्ये दोनदा करणारा एकमेव खेळाडू. दोन्ही विश्वचषकामध्ये. दोन्ही विश्वविक्रम. एकदिवसीय सामन्यांच्या इतिहासातील सर्वाधिक धावांच्या भागीदारीत सहभाग – सचिन तेंडुलकरसोबत ३३१ धावा.१९९९ च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज (४६१).विश्वचषकात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून शतक काढणारा एकमेव भारतीय.विश्वचषकात सलग दोन सामन्यांमध्ये शतके काढणारा केवळ दुसरा जागतिक खेळाडू (पहिला मार्क वॉ).सलग १२० एदिसांमध्ये शून्यावर बाद न होण्याचा विक्रम.दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी सामना जिंकवणारा पहिला भारतीय कर्णधार (दुसरा महेंद्रसिंग धोनी, सध्याचा दौरा).
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply