१३ जानेवारी १९७८ रोजी हैदराबादच्या लालबहादूर शास्त्री मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंड संघाला पराभूत करून ऑस्ट्रेलियाई महिलांनी प्रथमच विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. विजेती कर्णधार होती (सलामीवीरा आणि यष्टीरक्षिका) मार्गरेट जेनिंग्ज. ही दुसरी महिला विश्वचषक स्पर्धा होती.
हा सामना अत्यंत कमी धावसंख्येचा झाला. इंग्लंडचा डाव केवळ ९६
धावांवर संपुष्टात आला आणि विजयी उद्दिष्ट गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाला १८९ चेंडू खेळावे लागले. इंग्लंडच्या महिलांनी एकही वाईड किंवा नोबॉल टाकला नाही.
या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि भारत या चारच संघांचा सहभाग होता आणि साखळी पद्धतीने सामने खेळले गेले. साखळीतील तिन्ही सामने डायना एडलजीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने गमावले. (न्यूझीलंड तेवढाच एक सामना जिंकू शकले.) १ जानेवारी १९७८ ला झालेला इंग्लंडविरुद्धचा सामना हा भारतीय महिला संघाचा पहिलावहिला आंतरराष्ट्रीय सामना होता. सलामीच्या लढतीतही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला परास्त केले होते.
महिला विश्वचषक स्पर्धा पहिली (१९७३): इंग्लंडमध्ये. सर जॅक हेवर्ड यांच्या योगदानामुळे पुरुषांची अशी स्पर्धा होण्याच्या दोन वर्षे आधीच महिलांची स्पर्धा झाली. सात संघ : इंग्लंड (विजेता), ऑस्ट्रेलिया (उपविजेता), न्यूझीलंड, आंतरराष्ट्रीय एकादश, त्रिनिदाद अँड टोबॅगो, जमैका, यंग इंग्लंड.
दुसरी (१९७८): भारतात. उपरोल्लेखित.
तिसरी (१९८२): न्यूझीलंडमध्ये. पाच संघ : ऑस्ट्रेलिया (वि), इंग्लंड (उवि), न्यूझीलंड, भारत, आंतरराष्ट्रीय एकादश.
चौथी (१९८८): ऑस्ट्रेलियात. पाच संघ : ऑस्ट्रेलिया (वि), इंग्लंड (उवि), न्यूझीलंड, आयर्लंड, नेदरलँड्स.
पाचवी (१९९३): इंग्लंडमध्ये. आठ संघ : इंग्लंड (वि), ऑस्ट्रेलिया (उवि), न्यूझीलंड, भारत, आयर्लंड, वेस्ट इंडीज, नेदरलँड्स.
सहावी (१९९७): भारतात. अकरा संघ : ऑस्ट्रेलिया (वि), न्यूझीलंड (उवि), डेन्मार्क, इंग्लंड, भारत, आयर्लंड, नेदरलँड्स, द. आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज.
सातवी (२०००): न्यूझीलंडमध्ये. आठ संघ : न्यूझीलंड (वि), ऑस्ट्रेलिया (उवि), इंग्लंड, भारत, आयर्लंड, नेदरलँड्स, द. आफ्रिका, श्रीलंकाआठवी (२००५): दक्षिण आफ्रिकेत. आठ संघ : ऑस्ट्रेलिया (वि), भारत (उवि), इंग्लंड, आयर्लंड, द. आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज.
नववी (२००९): ऑस्ट्रेलियात. आठ संघ : इंग्लंड (वि), न्यूझीलंड (उवि), भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, द. आफ्रिका, श्रीलंका.
२०१३ ची महिला विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply