आपल्या जीवनात उद्येश्य हा असलाच पाहिजे आणि तो असतोच. फक्त तो निद्रिस्त असतो एवढेच. तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे कि तो उद्देश्य काय आहे ते शोधा आणि तुम्हालाच तो उलगडून दाखवा. आपल्याला काय हवे आहे, हे जर का आपणास ठावूक नसेल, तर आपण इतस्तत: भटकत राहू. तर तो उद्देश्य काय आहे? पैसे आहेत कि आनंद आहे? धाडस आहे कि साहस आहे? तुम्हाला प्रेरणा कशातून मिळते? जीवनाच्या अनुभवातून मिळते कि त्याच्या अर्थातून मिळते कि त्या दिशेला मिळते? त्याबद्दलची तुमची भावना काय असते?
तरी ह्या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत. आपण आनंदी किंवा सुखी कशामुळे होवू ह्या बद्दल विचार करावयास हवा. काही तज्ञांच्या मते, “आपण असे वागतो कि आपल्या जीवनाचा मुख्य हेतू आराम आणि ऐशोआराम मिळविणे आहे. परंतू त्या उलट, आपण आनंदी तेव्हा होवू ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये काही तरी उत्साहपूर्ण घडून येईल.” परंतू आपण आपल्या बरोबर फारच थोडा वेळ घालवीत असतो आणि त्यामुळे आपणास तो विचार करावयास वेळच नसतो. हे करण्यासाठी, एक करता येईल, आपणच आपणाला विचारावयाचे आपली किंमत काय आहे? हे जर आपणास माहित असेल, तर आपल्या जीवनातील उद्देश्य गाठण्यास आपणास सोपे जाईल.
दुसरा मार्ग म्हणजे तो लिहून काढणे होय. तुम्ही ब-याच वेळा लिहाल, आवडले नाही म्हणून फाडून टाकाल, पुन्हा लिहाल. काही हरकत नाही. याचाच अर्थ असा होतो कि तुम्ही विचार करता आहात. काही जन ह्यासाठी तासोन तास घेतील. काही हरकत नाही. परंतू ह्यामुळे तुम्हाला तुमचा शोध घेता येईल.
ज्यावेळेस तुम्हाला कळेल कि तुमचे हृदय धडधडू लागले आहे, त्यावेळेस थांबा. पहा, का आणि कसे ते तुम्हाला आनंदी करते आहे, उत्साही करते आहे आणि तुम्हाला ते प्राप्त झाल्याचे समाधान
मिळेल. तुम्हीच तुम्हाला प्रश्न विचारा कि आतापर्यंत तुम्ही हे का नाही केलेत? आपण स्वत:ला आपल्या उद्देश्यांवर केंद्रित न करता आपल्या भावनांवर केंद्रित करा. दुस-यांची मदत करणे किंवा दुस-यांना मदत करणे ह्यासारखा आपल्या जीवनात दुसरा कोणता आनंदी क्षण नाही.
हे सगळे साध्य करण्यासाठी तयार व्हा. तुमच्या जीवनात हाच मार्ग प्रकाश देईल आणि तुमचे उद्दिष्टय तुम्हाला साध्य करता येईल.
— मयुर तोंडवळकर
Leave a Reply