दहा पंधरा तीं वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची
मना वाटते आगळे करावे, उरली वर्षे जी जीवनाची….१,
वृधत्वाचा काळ गांजता, साथ न देयी शरिर कुणाला,
मना मारूनी बसावे लागे, ईश्वरी नाम घेत सर्वाला….२,
निसर्गरम्य स्थळ निवडूनी, मर्यादेत जगावे जीवन
दुजास कांहीं येईल देता हेच ठरवावे आजमावून…३,
बरेच केले स्वत:साठीं, समाधान परि नाहीं लाभले
दुजास मिळतां आनंद येई, खरे तत्त्व ते आज जाणले….४,
जेंव्हां करितो स्वत: करिता, स्वार्थी भाव तो लपला असे
दुजासाठी ते करिता सारे , स्वार्थी भाव ते राहील कसे ?….५,
शेवटचे ते सरते जीवन, प्रभू चरणी ते समर्पण व्हावे
हात जोडूनी विनंती करतो, दुजाच्या सेवेतच निघून जावे…६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply