जीवनात किती रंग,
पहावे,अन उधळावे,
सुख दुखांचे सोहाळे,
किती साजरे करावे ,–!!!
विविधरंगी मनसोक्त जगावे,
मिसळून त्यांच्यात तसेच होणे, पाण्याचाही रंग स्वीकारे,
सूज्ञही किती शहाणपणे,–!!!
अनेक अंगे जीवनाची,
कशी निरखून पहावी,
कंगोरे त्यातील अनुभवत,
पखरण पैलूंचीच करावी,–!!!
बालपणाचा रंग तो,
किती निर्व्याजपणाचा,
कुठला नाही मुलामा,
फक्त पारदर्शीपणाचा,–!!!
लाल हिरवा गुलाबी,
पिवळा केशरी जांभळा,
आयुष्य नवे ,हरेक दिवशी,
तारूण्याचा स्पर्श आगळा,–!!!
कर्तृत्वाचा रंग वेगळा,
कायमचाच चढत असे,
आयुष्य बदलूनच सारे,
सर्वदूर की पसरे,–!!!
देशप्रेमाचा रंगही,
नागरिक तो जपे,
सदैव आपल्या झेंड्याला,
झुकून सलाम ठोके,–!!!
वृद्धत्वाचा रंग चढता,
सर्वच रंग फिके,
दिसती फक्त डोळ्यांना,
जर्जर ती शरीरे,–!!!
जीवन जसे टाकते,
उधळून सारे रंग,
एकच रंग राहतो,
राहे मागे निस्संग,–!!!
हिमगौरी कर्वे.©
खूपच छान, सर्वांगाने विचार केलेला लेख आहे ??