नवीन लेखन...

जिगरबाज मल्ल गणपतराव आंदळकर

जिगरबाज मल्ल गणपतराव आंदळकर यांचा जन्म १७ एप्रिल १९३५ रोजी शिराळा तालुक्यातील पुनवत येथे झाला.

१९६० साली कुस्ती क्षेत्रातील मानाचा हिंद केसरी हा बहुमान मिळविणारे गणपतराव आंदळकर हे सांगली जिल्ह्याचे सुपुत्र होते. त्यांची सांगली आणि कोल्हापूर ही कर्मभूमी. वस्ताद बापू बिरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कुस्ती कलेचे धडे घेतले. गणपतराव आंदळकर यांच्या नावाचा दबदबा १९६०—७० च्या दशकातला. राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय मल्लांशी झुंजत त्यांनी कुस्ती रसिकांची मने जिंकली. कोल्हापूरच्या ख्यातनाम खासबाग मैदानात १९५८ साली पाकिस्तानचा पैलवान नासिर पंजाबी याला चारीमुंड्या चीत करून आक्रमक कुस्तीची झलक दाखवली आणि कुस्ती रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले. तेव्हाच्या जवळपास सगळ्या मल्लांशी त्यांनी दोन हात केले. मोती पंजाब, पहिले हिंद केसरी श्रीपाद खंचनाळे, मंगल पैलवान, बनातसिंग पंजाबी, हनीफ अहमद, श्रीरंग जाधव यांच्याशी तोडीस तोड कुस्ती केली.

मल्लविद्येतील त्यांची प्रगती पाहून १९६० साली मुंबईत झालेल्या ‘हिंद केसरी’स्पर्धेसाठी निवड झाली. पंजाबचा पैलवान खडकसिंग याला १० विरुद्ध ५ अशा गुण फरकाने हरवून हिंद केसरी गदेचा बहुमान मिळवला. कोल्हापूरच्या लालमातीची देशातील कुस्तीजगतात द्वाही फिरली. १९६२ मध्ये जकार्ता एशियाड स्पर्धेत ग्रीको रोमन गटात त्यांनी सुवर्णपदक, तर फ्री स्टाईलमध्ये रौप्य असे दोन्ही प्रकारामध्ये पदकाची कमाई केल्याने कुस्तीप्रेमींना त्यांना कोठे ठेवू असे झाले. गादीवरील खेळाचा पुरता अनुभव नसतानाही १९६४ साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले. पाकिस्तानच्या मल्लाशी कुस्ती म्हटली की कुस्तीशौकिनांना चेव चढतो. एक दोन नव्हे तर तब्बल ४० पाकिस्तानी मल्लांना अस्मान दाखवून त्यांनी कोल्हापूरच्या मातीची ताकद दाखवून दिली.

अशी दैदीप्यमान कामगिरी करणाऱ्या या मल्लाला अर्जुन पुरस्कार, शिव छत्रपती पुरस्कार, महाराष्ट्र गौरव आणि कोल्हापूर भूषण, राजर्षी छ. शाहू असे अनेक पुरस्कार मिळाले.

कुस्तीक्षेत्र आंदळकर यांना ‘वस्ताद’ म्हणून ओळख असे. पिळदार शरीरयष्टी असतानाही साधेपणाने जग जिंकता येते हे दाखवून देणाऱ्या आंदळकर यांनी मोतीबाग तालमीत नव्या दमाचे मल्ल घडवण्याचा वसा घेतला होता. १९६३ मध्ये मानाचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. १९८२-८३ साली त्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

गणपतराव आंदळकर यांचे १६ सप्टेंबर २०१८ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..