ह्यालाच बोली भाषेत गोडे काष्ठ असे म्हणतात व बाळ औषधी मध्ये देखील ह्याचा समावेश असतो.ह्याचे १-५ मीटर उंच बहुवर्षायू क्षुप असते.मुळ लांबट व लालसर पिवळे किंवा धुरकट असते.मुळाची साल काढल्यावर पिवळ्या रंगाची व धाग्यांनी युक्त गाभा असतो.मुळ व काण्डापासून शाखा प्रशाखा निघतात.पाने संयुक्त असतात व पर्णदल अंडाकार असतात.पर्ण दलाच्या ४-७ जोड्या असतात.ह्याला गुलाबी किंवा वांगी रंगाची मंजिरी स्वरूपात फुले येतात.फळ सुमारे २.५ सेंमी लांब व चपट्या शेंगांच्या स्वरूपात असतात.प्रत्येक शेंगेत २-३ वृक्काकार बिया असतात.
ह्याचे उपयुक्तांग मुळ आहे.ह्याची चव गोड असून हे थंड गुणाचे व गुरू व स्निग्ध असते.ज्येष्ठमध वातपित्तनाशक व कफकर आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:
१)केस गळणे व पिकण्याची तक्रार असल्यास ज्येष्ठमधाच्या काढ्याने केस धुतात.
२)पित्तामुळे होणाऱ्या उल्टीत ज्येष्ठमधाचा काढा देतात ह्याने आमाशय दाह कमी होतो.
३)दमा,खोकला ह्या ज्येष्ठमध वापर करतात कारण त्याने कफ सुटून मोकळा होण्यास मदत होते.अशा वेळी ज्येष्ठमधाचा तुकडा तोंडात ठेऊन चघळणे अथवा चुर्ण वापरणे फायदेशीर ठरते.
४)ज्येष्ठमध सिद्ध हिम अथवा ज्येष्ठमध सिद्ध दुध हे रस,रक्त व मांसगत पित्ताचे शमन करून उत्तम दाहशामक म्हणून कार्य करते.
५)ज्येष्ठमध चुर्ण मध व तुपासह घेतल्याने मांसधातुचे पोषण होते व नवीन मांसांकुर उत्पन्न होतात व जखम लवकर भरते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply