पुण्यामध्ये एक ‘आगळे वेगळे’ ज्योतिषी आहेत. त्यांचे भविष्य कथन अचूक आणि सकारात्मक असते. पण त्यांच्या मते ज्योतिषामध्ये कांही अनीष्ट प्रथा आहेत. ‘कर्मकांड’ या नावाने या प्रथा आजही अस्तित्वात आहेत. शापित पत्रिका, कालसर्प योग, नारायण नागबळी, मंगळ दोष, ग्रह दोष, नक्षत्र दोष, साडेसाती, वास्तू दोष ही ती ‘कर्मकांडे’ आहेत. त्यांच्या मते प्रत्यक्षात अशी कोणतीही कर्मकांडे अस्तित्वात नाहीत. ही सर्व काल्पनिक किंवा मानव निर्मित आहेत.तसेच देवाची शांत, ग्रह शांत,नक्षत्र शांत यातील ‘शांत’ या शब्दाला त्यांचा विरोध आहे. त्यांच्या मते पृथ्वीवरील कोणीही माणूस एवढा महान किंवा शक्तिवान झालेला नाही की तो एखाद्या देवाची, ग्रहाची किंवा नक्षत्राची शांत करू शकेल.तो फार फार तर त्यांची ‘पूजा’ करू शकेल. त्यामुळे कुठलीही ‘शांत’ ही शेवटी एक ‘पूजा’ असते. अशा प्रकारच्या पूजांना किंवा धर्म कार्यांना त्यांचा विरोध नाही. पण कर्मकांडांना त्यांचा सक्त विरोध आहे. ही कर्मकांडे व शांती म्हणजे ज्योतिष शास्त्रातील अंध श्रद्धा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक लोक अशी कर्मकांडे व शांती करण्यासाठी वारेमाप पैसे खर्च करीत असतात. पण त्याचा उपयोग होत नसतो. ही कर्मकांडे व शांती म्हणजे ज्योतिषांना व धर्म कार्य करणाऱ्या गुरुजींना पैसे मिळवून देण्याची साधने बनली आहेत. ज्योतिषातील या अनीष्ट प्रथा व अंध श्राधेविरुध्ध आवाज उठविण्याचे व जन जागृती करण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. हे प्रवाहाच्या विरुध्ध पोहाण्यासारखे आहे याची त्यांना जाणीव आहे.आपणही आपल्या परीने त्यांच्या या कार्याला हातभार लावायचा प्रयत्न करू या!
या ज्योतिषाचे नाव नंदकिशोर जकातदार असे आहे.
— उल्हास हरी जोशी
January 10, 2011
Leave a Reply