गोरी तेरा गांव बड़ा प्यारा’, ‘सुरमई अखियों में’, ‘दिल के टुकड़े-टुकड़े करके’, ‘जानेमन-जानेमन तेरे दो नयन’, ‘चांद जैसे मुखड़े पे’, ‘निसा गमा पनी सारे गा’ या सारखी अप्रतीम गाणी देणारे येसुदास यांचे वडील मल्याळम शास्त्रीय संगीतकार होते. त्यांचा जन्म १० जानेवारी १९४० रोजी झाला.त्यांचे पहिले गुरू त्यांचे वडील होते, वयाच्या सात वयाच्या वर्षी कोची स्थानिक स्पर्धा भाग घेतला तेव्हा सुवर्णपदक जिंकले. सुरवातीचे संगीत प्रशिक्षण त्यांनी R.L.V. संगीत Thrippunithura अकादमी येथे केले.
येसुदास गाण्याची निवड फारच विचार पूर्वक करीत असतात. सध्याच्या पध्दतीची गाणी त्यांना आवडत नाहीत. १९७० च्या पासून येसूदास हिंदी गाणी गात आहेत. येसूदास यांनी १४ भाषेत जवळजवळ आज पर्यत ४५००० गाणी गायली आहेत. त्यांनी मल्याळम, तामिळ आणि हिंदी मध्ये पण गायली आहेत. ते मल्याळम चित्रपट उद्योगात जास्त प्रसिद्ध आहेत. पहिले हिंदी गाणे गायन सुरु केले तो चित्रपट जय जवान जय किसान होता, पण पहिला प्रदर्शित चित्रपट छोटी छोटीसी बात होता.
येसूदास यांनी अमिताभ बच्चन, अमोल पालेकर आणि जितेंद्र यांच्या साठी हिंदी गाणी गायली आहेत. त्यांनी रवींद्र जैन, बाप्पी लाहिरी, खय्याम, राजकमल आणि सलील चौधरी याच्या समावेत अनेक सदाबहार हिंदी चित्रपटातील गाणी गायली आहेत. त्याचा एक मुलगा विजय येसूदास, हा गीतकार आहे. मा.येसूदास यांना गायक म्हणून सात वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे व तो प्राप्त करणारे ते देशातील एकमेव गायक आहेत.
येसुदास हे फक्त गायक नसून दक्षिण भारतीय भाषेत ‘वडाक्कुम नाथम’, ‘मधुचंद्र लेखा’ और ‘पट्टनाथिल सुंदरन’ असे निर्माता म्हणून चित्रपट बनवले आहेत. भारतीय संगीतात मोलाचे योगदान दिल्याने केरळ सरकारने संगीत क्षेत्रातील सर्वोत्तम ‘स्वाती पुरस्कारम’ हा पुरस्कार देऊन येसूदास यांचा गौरव केला आहे. २००२ मध्ये भारत सरकारने ‘पद्म भूषण’ देऊन गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
काही येसूदास यांची गाणी
जब दीप जले आना
तु जो मेरे सूर मे
सुरमई अखीयो से
माना के तुम
गोरी तेरा गाव बडा प्यारा
निसा गमा पनी सारे गा
मराठी गाणी येसूदास यांची
दूर दूर जाऊ या
वेली वेली उमले कळी
https://youtu.be/dNWfplTPYIs
Leave a Reply