मी अजूनही मोबाईल फोन वापरत नाही.मोबाईल या विषयावर आता उलटसुलट बोलण्यासारखे काही राहिलेले नाही. ती एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे यात वादच नाही. पण तरी मी अजूनही मोबाईल वापरीत नाही आणि त्यामुळे माझे फारसे काही अडतही नाही.
पण माल याचे फायदे असे की प्रवासात एखादे पुस्तक वाचू शकतो. मित्र असला आणि त्याचा मोबाईल मध्येच नाही वाजला तर कितीही वेळ गप्पा मारू शकतो.प्रवासात आजूबाजूला किती सुधारणा झाल्या आहेत, किती विविध प्रकारचे सहप्रवासी आहेत,फेरीवाले आणि निरनिराळी माणसे कशी वागतात अशा अनेक गोष्टींचा आस्वाद घेत घेत माझा प्रवास पूर्ण होतो.अगदी झोप जरी लागली तरी फोन वाजला म्हणून किंवा वाजला नसेल ना या भीतीने मला जाग येत नाही. मस्त ताणून देता येते.कितीतरी गंमती … सगळ्याच देत येत नाहीत.
पण मित्र,नातेवाईक, सहप्रवासी यंच्या मोबाईल वापरातील वैविध्यातून मला सुचलेल्या काही नवीन मोबाईल म्हणी—
१) स्वामी तिन्ही जगाचा , चार्जरविना भिकारी
२) बुडत्या बँटरीला , चार्जरचा आधार
३) चेहेऱ्यातच नाही तर सेल्फीत कुठून येणार ?
४) नाय ते app आणि डोक्याला ताप
५) फोन वितभर आणि एक्सेसरीज हातभर
६) आला मेसेज, केला फॉरवर्ड
७) एक न धड आणि भाराभर चार्जर
८) खाली मुंडी आणि contact धुंडी
९) मुंबईचा पाउस आणि मोबाईलवरचा DP, कधी बदलेल सांगता येत नाही
१०) बायकोचा नसेलना म्हणून सतत स्क्रीन बघतो आणि म्हणे बायकोला कोण भितो !
— मकरंद करंदीकर.
Leave a Reply