काही म्हणतात प्रेमात पडायचे असते
तर काही म्हणतात प्रेम करायचे असते…
काहीही असो प्रेम महत्वाचे
पण काहीना तेही आवडत नाही….
प्रेमात असताना अनेक जण किवा जणी
खुप ‘ डोळस ‘ प्रेम करतात..
मग ते खरे प्रेम असते ..
का तिथे पण ६०-४०% हिशेब असतो….
असेल बुवा ६०-४० चा नाद अनेकांना
कदाचित वृतीने टक्केवाले
अधिकारी-कर्मचारीअसतील…
टक्क्यावर जगणारे…
पण प्रेमात असे नसावे
असे वाटते…
अर्थात ते हिशेब त्यांना
चुकते करावे लागतात
एखाद्या एकाकी
वळणावर……
— सतीश चाफेकर.
Leave a Reply