नवीन लेखन...

काजळी धरल्या वाती

तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां
आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना,

शांत जळते केंव्हां तरी,  भडकून उठते कधी कधी
फडफड करित मंदावते,  इच्छा दाखवी घेण्या समाधी

जगदंबेच्या प्रतिमेवरती,  प्रकाश टाकूनी हास्य टिपते
हास्य बघूनी त्या देवीचे,  चरण स्पर्शण्या झेपावते

अजाणपणाच्या खेळामधली,  स्वप्न तरंगे दिसूनी येती
दिव्यामधले तेल संपता,  काजळी धरल्या दिसे वाती

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..