हा मध्यम उंचीचे वृक्ष अाहे.ह्याची त्वचा धुरकट व खडबडीत असून ह्याचे काण्ड सरळ वाढते,पाने एकांतर असून १-२ सेंमी लांब व १.२५-२.५० सेंमी रूंद,द्विखण्ड व अग्रभागी गोल असतात,हृदयाकृती असतात.फुल मोठे,पांढरे,जांभळे,निळे अथवा गुलाबी रंगाचे असते.फळ १५-३० सेंमी लांब व २-२.५ सेंमी रूंद असते.ह्या चपट्या व कडा मुडपलेल्या शेंगा असतात.शेंगेत १०-१५ बिया असतात.
ह्याचे उपयुक्तांग आहे त्वचा व फुले.ह्याची चव तुरट असते.व ती थंड गुणाची असते व हल्की व रूक्ष असते.कांचनार कफ व पित्तनाशक आहे.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)व्रण धुवायला कांचनारचा काढा वापरतात.
२)कांजण्या व गोवर ह्यात कांचनारचा काढा शरीरातील उष्णता कमी करायला उपयोगी आहे.
३)शरीरावर उत्पन्न होणाऱ्या गाठीवर कांचनार सालीचा काढा सुंठी सोबत देतात.
४)शरीरावरील गाठींवर कांचनार ताकात उगाळून लेप करतात.
५)गुदभ्रंशात कांचनार उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
मराठीत काय म्हणतात
hi we r from phaltan satara
my abnormal daughter having overian lump (ganth)