ह्याचा मध्यम आकाराचा ८-१६ मी उंचीचा वृक्ष आहे.ह्याची पाने २०-४२ सेंमी लांब असतात तर पत्रके ५-१० सेंमी लांब असून हि ५-७ पत्रके असतात.फुले निळसर पांढरी असून प्रत्येक फळात अंडाकार किंवा वृक्काकार बी असते.हि बी १.७-२ सेंमी लांब व १.२-१.८ सेंमी रूंद असते.ह्यात तांबुस रंगाची तैलयुक्त बीज असते.
करंजाचे उपयुक्तांग आहे त्वचा,पाने,बीज.करंज चवीला कडू,तिखट असून उष्ण गुणाचा व हल्का व तीक्ष्ण आहे.करंज कफवातनाशक व पित्तकर आहे.
चला आता आपण ह्याचे उपयोग जाणून घेऊयात:
१)करंजाचे तेल त्वचारोगात व व्रणात लावायला उपयुक्त आहे.
२)तोंड स्वच्छ करायला करंजाच्या काड्या दात घासायला वापरतात ह्याने दातांची मुळे बळकट होतात.
३)करंजाच्या बियांपासून काढलेले तेल कृमिनाशक आहे.
४)डांग्या खोकल्यामध्ये करंजाचे बी पाण्यात उगाळून देतात.
५)करंजाचा लेप खाज,खरूज,गजकर्ण व अन्य त्वचा रोगात उपयुक्त आहे.
६)सुज आलेल्या भागावर करंजाच्या पानांची चटणी बांधतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
मला करंज लागवड करण्याची इच्छा आहे कृपया लागवड व विक्री बाबत मागॆदशॆन करावे
Ashwini:
*शेतकऱ्यांचा AC म्हणजे करंजीचे झाड*
सध्या शहरी भागाबरोबर खेड्यातही उष्णतेमुळे लोक हैराण होत आहेत. पुर्वी असं नव्हतं. कारण खेड्यात नळ्यांच्या खापऱ्या आणि गवताच्या झोपडया होत्या . आता स्लँब आणि पत्रे आले. मे महिन्यात शेतीची कामे .ग्रीष्मात बहुधा झाडांना बहर येतो. शेतकरी फळांनी लहडलेल्या झाडाखाली कधीच विश्रांती घेत नाही. अशावेळी त्याचा एकच आधार *करंज*
करंजीची पान गळती मार्चमध्ये होते. अखंड झाड पर्णहीन होतं. झाडाखाली वाळक्या पानांचा ढीग पडतो. नवख्या बघणाऱ्याला वाटतं संपलं हे झाड. आणि उष्णता वाढायला लागते,तसा *करंज* सुवासिनी सारखा दाट हिरव्या पानांनी नटून उष्णतेला अंगावर झेलतो. पानं किती ! वर आभाळ दिसणार नाही इतकी गच्च. आणि सावली! नितळ गार अंगचा गारवा असलेली . वारं असो अगर नसो याच्या सावलीत उष्णतेच्या झळा अलगत शोषून घेण्याची क्षमता . मग मिळते समाधाची विश्रांती. म्हणून हा शेतकऱ्यांचा AC . या झाडाचा पाला वेगानं कुजतो. फुलांचा सडा पडून माती भुसभुशीत होते. फुलातील मध अंगातील उष्णता कमी करतो. बीयांच्या तेलापासून खरुज, नायटा, गजकर्ण यासारखे बूरशीजन्य रोग नष्ट होतात, घरातील लाकडाला पोखरकिडा लागला तर याचेच तेल वापरतात. पायात रात्रीची आग (भगभग )होत असेल तर पानांचा लेप तळपायावर लावतात.यासारखे अनेक औषधी उपयोग या झाडाचे . विशेष म्हणजे हे झाड जळावू लाकडांसाठी तोडले जात नाही. त्याचे कारण दुसऱ्याची *किड* संपवणारे हे झाड स्वतः तोडल्या आठ दहा दिवसात किडून नष्ट होते. कमी पाण्यामध्ये जगणारे ,गारवा देणारे , निसर्ग वाढविणारे, औषधी गुणधर्म असलेले, देशी झाड निसर्ग प्रेमींनी लावायलाच हवे. याच्या बीया खुप मिळतात. किंवा जंगलात फिरण्यास गेल्यास बहुधा ओढ्याकाठी त्या मिळतात. त्याचा आकार दिवाळीतल्या फराळातील करंजी सारखा.निसर्ग नाती वाढविण्यासाठी त्याचे वाटप करुया . जंगल वाढविण्यासाठी हातभार लावूया.
मित्रांनो माहिती आवडली तरच पुढे शेअर करुया. जंगल जागृती वाढवुया .अरण्य साक्षरता वाढवूया..
हि माहीती खरी आहे का?
तुम्ही खुपच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद