।। विनायकाय नम: केतकीपत्रं समर्पयामि।।
केवड्याचे बन हे जंगलात पाण्याच्या जवळपास आढळतात.ह्याचा वास सापांना आवडतो अशी मान्यता आहे.ह्याचे ३-४ मीटर उंचीचे गुल्माकृती बेट असते.काण्ड वाकडे अनेक शाखा प्रशाखायुक्त असते.त्यापासून निघणारे अंकुर वडा प्रमाणे जमिनीत घुसतात.
पाने १-२ सेंमी लांब,सरळ वाढतात व टोकाकडे खाली झुकलेले स्निग्ध असतात.कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर पिवळे सुगंधी,टोकदार,तीक्ष्ण दंतूर कडा असलेले असते.फुल एक लिंगी असते व फळ १०-२५ सेंमी लांब,१०-२० सेंमी व्यासाचे व १२-१५ सेंमी लांबीच्या वृन्तावर येते.
केवड्याचे उपयुक्त अंग आहेत फुल,मुळ व सिध्द तेल.हे चवीला कडू,गोड,तिखट असून उष्ण गुणाचे व हल्के व स्निग्ध असते.केवडा त्रिदोष शामक असला तरी प्रामुख्याने कफपित्तनाशक आहे.
आता आपण ह्याचे उपयोग पाहूयात:
१)केवड्याच्या तेलाचा उपयोग आमवात,कंबरदुखी,डोकेदुखीत उपयुक्त आहे.
२)त्वचारोगामध्ये तसेच त्वचेचा वर्ण सुधारण्यास देखील केवडा उपयुक्त आहे.
३)केवड्याचे तेल हे शरीरदुर्गंधी कमी करायला उपयुक्त आहे.
४)केवड्याचा सुगंध मन प्रसन्न ठेवतो.
५)केवड्याचे मुळ हे वंध्यत्वामध्ये उपयुक्त आहे.
सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
सुंदर माहिती. किचन क्लिनिक ह्या सदरातील लेख वाचण्यासाठी आवडतील.?