उन्हाळ्याच्या वेळी वेगवेगळी वन्य उत्पादने गोळा करण्यासाठी आदिवासी तसेच अन्य बांधव जंगलात जातात. डिंक,तेंदूपत्ता, मोहफुले,हिरडा बेहडा तसेच रानमेवा गोळा करून, त्यांच्या विक्रीतून आपले जीवन जगत असतात. वन्य उत्पादने गोळा करण्यासाठी काही वेळा स्वच्छ जागेची गरज असते, ती जागा स्वच्च्छ करण्यासाठी जंगलांना आग लावून दिली जाते.त्या आगीचे वणव्यात रुपांतरण होता आणि वणवा पसरत जातो. अल्प शिक्षणामुळे जंगलांवर अवलंबून असलेले बांधव,’ होणाऱ्या हानीबाबत व्यापक व दूरगामी विचार करू शकत नाही. या सर्व जंगलांच्या परिसरात राहणाऱ्या बांधवाना जागरूक करण्याची आम्हा सर्वांची जबाबदारी आहे.
वन्य प्राण्यांची तस्करी करणारे लोक जंगलांना आग लावून देतात,आगीच्या भीतीने पळणाऱ्या वन्य प्राण्यांची शिकार करणे तस्करांना यामुळे सोपे होते.अश्या बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून ती माहिती वनविभागापर्यंत येत नाही, किवा आली तर जलद गतीने यावर कारवाही होत नाही.या प्रकाराबाबत लोकांची जागरुकता वाढविणे आवश्यक आहे.
सगळे प्रकार होताना आपण बघ्यांची भूमिका घेतो, मला काय त्याचे , माझ्या एकट्याने काय बिघडणार आहे ? अशी आपली मानसिकता असते.अश्याप्रकारचा विचार करण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत.
— नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
Leave a Reply