हर्बल गार्डन हे सदर आणि त्यातील सर्व लेख कॉपीराईट कायद्याखाली नोंदवले आहेत. यातील कोणताही लेख कोणत्याही माध्यमातून शेअर करताना लेखकाच्या नावासहित शेअर करणे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
खदिराचा मध्यम उंचीचा वृक्ष असतो. ह्याची त्वचा १ सेंमी जाड असून काळपट धुरकट रंगाची किंवा पांढरी असते. ती आतून भुरकट लाल व लांबी मध्ये पातळ पापुद्रे सोडणार असते.त्याच्या खोडांवर व खांद्यावर काटे असतात.ह्याची पाने ८-१० सेंमी लांब पक्षाकार,संयुक्त बारीक लव असलेली ३०-४० जोड्यांमध्ये असतात.फुले लहान पिवळे तीन पुष्पदल असणारे असतात.फळ ५-१० सेंमी लांबीच्या शेंगा ज्या किंचित धुरकट व चकचकीत असतात.त्यात ५-८ गोल बिया असतात.उन्हाळ्यात खदिरातून निर्यास रूपी कात पाझरतो.
खदिराचे उपयुक्तांग आहे त्वचा व कात अर्थात खदिरसार.खदिर चवीला कडू, तुरट असून थंड गुणाचा व हल्का व रूक्ष असतो. हा कडू , तुरट व थंड असल्याने पित्तशामक व थंड सोडुन अन्य गुणांनी कफशामक आहे.
चला आता आपण खदिराचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)खदिर उत्तम रक्तस्तंभक व श्लेष्मधरा कला संकोचक असल्याने रक्तस्त्राव थांबावयास उपयुक्त आहे.
२)दातांच्या विकारात खदिराचे मंजन केल्याने हिरड्या बळकट होतात व पू रक्तस्त्राव थांबतो.
३)मुखपाक अर्थात तोंडात उष्णतेचे फोड आल्यास तोंडामध्ये खदिराचा काढा व मध धरून गंडवशील करतात.
४)घशाच्या रोगामध्ये खदिरसार उत्तम औषध आहे.गायकांच्या घशाला खदिर बळ देते म्हणून त्यास गायत्री हे पर्यायी नाव आहे.
५)रूक्ष असल्याने खदिर लेखन कार्य करून शरीरातील मेद कमी करते व स्थौल्यनाश करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
©️ वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क : ९९६०६९९७०४
हर्बल गार्डन हे सदर आणि त्यातील सर्व लेख कॉपीराईट कायद्याखाली नोंदवले आहेत. यातील कोणत्याही लेख कोणत्याही माध्यमातून शेअर करताना लेखकाच्या नावासहित शेअर करणे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Leave a Reply